SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मोठी शिक्षक भरती, असा करा अर्ज..!

शिक्षकाच्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षक पदाच्या 231 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठीची अधिसूचना (BAMU Aurangabad Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.

पात्र उमेदवारांना शिक्षक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. त्यासाठीची अंतिम मुदत, शैक्षणिक पात्रता, अर्ज कुठे करायचा, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

शिक्षक – एकूण जागा 231

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
– शिक्षक पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं असावं.
– उमेदवाराचे शैक्षणिक ज्ञान चांगलं असणं आवश्यक.
– उमेदवार चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेला असावा.
– नेट (NET) परीक्षा दिलेली असावी.

Advertisement

महत्त्वाच्या सूचना
– साध्या कागदावर किंवा बायोडाटा किंवा सीव्हीच्या स्वरूपात केलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
– ई-मेल आयडी किंवा फॅक्स (FAX) द्वारे येणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
– अर्ज करण्यापूर्वी ‘सेल्फ अटेस्टेड’ झेराॅक्स कॉपीज अपलोड कराव्यात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर 2021

Advertisement

सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1Src5fhrCYNIFuIv8kG15ODTy5TyxC6lG/view

कुठे करणार अर्ज..?
https://online.bamu.ac.in/recruitment/pages/forms/chb_register.php

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement