SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांनो! मळणी यंत्र वापरताना काय काळजी घ्याल? जाणून घ्या..

सध्या खरिपामधील बरेच पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. अनेक पिकांच्या काढणीनंतर कामे सुरू झाली असून, त्यात मळणी हे अत्यंत महत्त्वाचे काम असते. मागील पिढ्यांपासून पारंपरिक पद्धतीमध्ये हाताने झोडून, बैलांचा उपयोग करून किंवा पारंपरिक पद्धतीने लोंब्या, ओंब्या आणि शेंगांमधून दाणे वेगळे केले जात असत.

योग्य यंत्राची निवड:

Advertisement

देशातील शेतकरी आता विविध यंत्र वापरून शेतीची कामे करत असतात. मळणी यंत्र म्हणजेच थ्रेशर खरेदी करतेवेळी ते भारतीय प्रमाणीकरण यंत्रणेद्वारे तपासलेले व आयएसआय (ISI) मार्किंग केलेले आहे का हे पाहावे. त्यात त्यावर काम करणाऱ्या माणसांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या काळजी व संरक्षक आवरणे दिलेली आहेत का, हेही पाहावे. ज्याच्या फीड ड्रेनची लांबी किमान 900 मिमी व रुंदी (ड्रमच्या तोंडाजवळ) किमान 220 मिमी आहे, त्यावरील आच्छादनाची लांबी किमान 450 मिमी असली पाहिजे. त्यामुळे हात धुऱ्यापर्यंत सहज पोहोचू शकत नाही. झाकलेल्या भागाची उचल 100 ते 300 मिमी असली पाहिजे. थ्रेशरसह 5-10 अंशांच्या कोनात स्टफिंग शूट वरच्या दिशेने झुकवून पीक सहजपणे थ्रेशरमध्ये टाकता येते. फीड ड्रेनमध्ये कुठेही टोकदार कोन नसायला हवेत.

मळणी यंत्रात पिके टाकण्याची पद्धत:

Advertisement

एखाद्या व्यक्तीकडून मळणी यंत्रात पीक टाकण्याचे काम केले जाते. बऱ्याच वेळा थ्रेशरमध्ये घाई-घाई पीक टाकलं जातं. या घाईमुळे कधी कधी अपघात होतात. म्हणून थ्रेशरमध्ये पीक टाकण्यासाठी दोन व्यक्ती हव्यात. एका व्यक्तीने खालून पीक उचलून दिलं की, दुसऱ्या व्यक्तीने ते मशिनमध्ये टाकायला हवं. थ्रेशरमध्ये पीक टाकणारी व्यक्ती सपाट आणि मजबूत जागेवर उभी असावी. खाट, धान्याच्या पोते, पिकांच्या गाठी किंवा टायर इ. उभे राहून काम करताना शरीराचे संतुलन बिघडून तोल जाऊ शकतो. अशी व्यक्ती सरळ यंत्रावर पडण्याचा धोका असतो.

काही व्यक्ती जास्त उंचीवर उभी राहून नाहीतर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून थेट थ्रेशरमध्ये पीक टाकतात. मग अशा वेळी हातांचा वापर करण्याऐवजी पायाने ढकलून पीक थ्रेशरमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करते. अशा वेळी तोल जाण्याचा धोका वाढतो. पिकासोबत हात किंवा पाय आत खेचला जाऊन अपघात होऊ शकतो. सोयाबीन, हरभरा, मसूर, बाजरी इ. झुडपी पिके मळताना विशेष काळजी घ्यावी.

Advertisement

काटेरी पिके मळत असताना अनेकदा शेतकरी हाताला जुन्या कापडाचा तुकडा किंवा पोते गुंडाळतात. हेही धोक्याचे असते. कारण टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये कापड, पोते यांचे धागे, पट्टी किंवा लोंबणारे भाग बहुतेकदा थ्रेशरच्या धुराकडे खेचले जातात. त्यामुळे हात आत जाऊन अपघात होऊ शकतो. हातात रबरी किंवा चामड्याचे हातमोजे घालावेत.

थ्रेशर चालवणाऱ्या व्यक्तीचे कपडे ही अंगाभोवती घट्ट असावेत. सैल कपडे उदा. कुर्ता, धोतर, महिलांची साडी किंवा लांब केस इ. पट्ट्या किंवा मशिनच्या अन्य हलत्या भागांमध्ये अडकून गंभीर अपघात होऊ शकतो. थ्रेशरवर काम करताना महिलांनी केस व साड्या घट्ट बांधाव्यात. जेव्हा थ्रेशर बेल्ट-पुली वापरून ट्रॅक्टर किंवा अन्य कोणत्याही ऊर्जा स्रोतांद्वारे चालवले जातात, तेव्हा हलणारे भाग लाकडी चौकटीने किंवा लोखंडी जाळीने झाकावेत. तिकडे लहान मुले जाणार नाहीत, याची विशेष काळजी घ्या.

Advertisement

जास्त थकवा येत असेल तर..: सलग काम करून वेगाने काम संपवण्याकडे साऱ्यांचा (मशिनचालक, मालक आणि शेतकरी यांचा) कल असतो. मात्र सलग विशेषतः रात्री उशिरापर्यंत काम करणे शक्यतो टाळावे. कोणत्याही स्थितीमध्ये थकल्यावर काही काळ तरी आराम करावा. शक्य असल्यास यंत्रावर काम करणाऱ्या व्यक्ती दर काही काळानंतर बदलून आराम द्यावा. किंवा वेगळे काम द्यावे. थकवा, झोप आल्यामुळे अपघात होण्याची प्रमाण जास्त असते. थकलेल्या स्थितीत मळणी यंत्रात पिकांच्या फांद्या भरण्याचे काम करू नये.

थ्रेशरच्या स्टफिंग शूटची उंची आपल्या कोपराच्या उंचीइतकीच असावी. त्यापेक्षा स्टफिंग शूटची उंची जास्त असताना सतत हात उंचावून टाकावे लागते. ही उंची फारच कमी असल्यास कंबरेतून वाकून दीर्घकाळ काम करावे लागते. या दोन्ही बाबतीत जास्त थकवा जाणवतो. थ्रेशरवर 3-4 तासांपेक्षा अधिक काळ सलग काम करू नका.

Advertisement

यंत्राची अचूक तपासणी गरजेची:

थ्रेशर सुरू करण्याआधी प्रथम तपासणी करून घ्या. विशेषतः थ्रेशरच्या आतील भागात फिरणारे लोखंडी भाग, ड्रममधील भाग सैल नाहीत, त्यांचे आवाज येतात का, घासले तर जात नाहीत ना, हे नीट पाहावे. अनेकदा नेहमीच होणाऱ्या घर्षणामुळे आग लागू शकते.

Advertisement

विजेवर चालणाऱ्या थ्रेशर बाबतीत विद्युत तारा, जोड उघडे राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी. या वायर्स जास्त ताणू नयेत. त्यातून अपघात होऊन विजेचा धक्का बसणे किंवा आग लागणे अशा घटना उद्‌भवू शकतात. विजेचा शेतामध्ये असू किंवा कोठारात उघडे ठेवू नका ज्याठिकाणी थ्रेशर चालू आहे. जर एखादी व्यक्ती वायरच्या संपर्कात आली तर विद्युतदाबामुळे करंट लागू शकतो व कोठारात आग लागू शकते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement