SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करताय? मग काय आहे आजचा भाव जाणून घ्या..

धनत्रयोदशीच्या दिवशीच सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. धनत्रयोदशीला (Dhanteras 2021) सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. काही लोक सोन्याचे दागिने देखील खरेदी करतात. खरेदी केल्यानं वर्षभर घरात आणि व्यवसायात समृद्धी मिळते. आपल्यावर धनाची देवी लक्ष्मी वर्षभर कृपा करते.

आता लग्नसराईही 19 नोव्हेंबरनंतर चालू होईल. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर आवर्जून सोनं खरेदी केलं जातं. जर गुंतवणुक करण्यासाठी विचार केला तर सोन्यात गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं. कारण गुंतवणुकीच्या बहुतांश पर्यायांपैकी सोने गुंतवणुकीचा पर्याय सर्वात जास्त परतावा (Return) देणारा आहे. आता हे फक्त सोन्याच्या गुंतवणुकीसाठीच (Gold Investment) नव्हे तर तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढीसाठीही खरेदी करून ठेवू शकता.

Advertisement

आज सोने-चांदीचा भाव काय आहे?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,740 रुपये आहे. तर मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 47,740 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,050 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 49,320 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,740 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 47,740 रुपये इतका असेल. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी 64,600 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 646 रुपये आहे.

Advertisement

गेल्या 10 वर्षांत अंदाजे 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर:

गुड रिटर्न्स वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार हे, 2011 मध्ये 26 हजार 350 रुपये, 2012 मध्ये 31 हजार 25 रुपये, 2013 मध्ये 29 हजार 650 रुपये, 2014 मध्ये 28 हजार रुपये, 2015 मध्ये 26 हजार 400 रुपये, 2016 मध्ये 28 हजार 700 रुपये, 2017 मध्ये 26 हजार 600 रुपये, 2018 मध्ये 31 हजार 400 रुपये, 2019 मध्ये 35 हजार 300 रुपये 2020 मध्ये 48 हजार 800 रुपये, 2021 मध्ये 48 हजार 850 रुपये (आतापर्यंत), अशा पद्धतीने भावात चढउतार झाल्याचं कळतंय. यामध्ये मागील 2 वर्षांमध्ये सर्वात जास्त भाववाढ (Gold-Silver Rate today) असल्याचं समजतंय.

Advertisement

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी?

तुम्हाला सोने खरेदी करताना हे माहीतच असेल की, 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध सोने (Pure Gold) असते, पण पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवत नाहीत. अशी माहीती आहे की, 22 कॅरेट सोन्याचा वापर सोन्याचे दागिने बनवण्यासाठी करतात आणि त्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. समजा तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल, तर तुम्हाला हे ठाऊक हवं की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळलेले असतात. तसेच, दागिन्यांमध्ये शुद्धतेसंबंधी पाच प्रकारचे हॉलमार्क दागिन्यांवर असतात.

Advertisement

( सोने-चांदीचे खरेदी करताना अचूक दरांसाठी आपल्या स्थानिक ज्वेलरशी नक्की संपर्क साधा. वरील दर व आपल्या शहरातील दर यामध्ये किंचित फरक असू शकतो.)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement