SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग: राज्यात खळबळ घालणाऱ्या अति महत्वाच्या 3 बातम्या, वाचा..

▪️ “वानखेडे घालतात 70 हजारांचा शर्ट आणि…..,”

आर्यन क्रूझ ड्रग्ज प्रकरणामध्ये (Aryan Cruise Drugs Case) आज मंगळवारी सकाळी महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मलिक म्हणाले की, समीर वानखेडे हे 70 हजारांचा शर्ट (Wankhede wears a shirt worth Rs 70,000) घालतात.तसेच ते 2 लाख रुपयांचे बूटही घालतात. त्यांचे बाकी अधिकारी बघितले तर ते फक्त फक्त 700 ते 1000 रुपयांपर्यंतचा शर्ट घालतात. पण वानखेडे 70 हजारांचा शर्ट घालतात. वानखेडे दररोज नवीन शर्ट घालतात, त्यांनी देशाचे पंतप्रधान मोदींनाही मागे टाकले आहे. इतकंच नव्हे, तर वानखेडे हे 2 लाख रुपयांचे बूटही वापरतात आणि तब्बल 25 लाख रुपयांचे घड्याळ घालतात. एका सामान्य अधिकाऱ्याकडे हे सर्व आले कुठून? मी प्रार्थना करतो की, असेच ईमानदार लोक देशभरात असावेत”, असे मलिक म्हणाले.

Advertisement

यावर वानखेडे यांच्या बहिणीने पत्रकार परिषदेत माहीती देत म्हटलं की,”माझा भाऊ अतिशय तंतोतंत राहतो. तो पैसे साठवून कपडे घेतो. नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आरोप केले आहेत पण माझा भाऊ हा त्याने एक वर्षांमध्ये बचत केलेल्या पैशांमधून कपडे वगैरे अशी अशी सर्व शॉपिंग करतो. तो त्याला वर्षभरात लागणारे सर्व कपडे एकदाच घेतो आणि हे सर्व कपडे तो वर्षभर वापरतो.”, असं त्या म्हणाल्या.

▪️ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार याना आयकर विभागाची नोटीस!

Advertisement

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आयकर विभागाने अनेक मालमत्ता जप्त करण्यासंबंधीची नोटीस (Notice of Income Tax Department to Deputy Chief Minister Ajit Pawar) बजावली आहे. महाराष्ट्रातील 27 मालमत्ता, गोव्यातील 250 कोटींचे रिसॉर्ट आणि 600 कोटींच्या साखर कारखान्याचा समावेश आहे. त्यात दिल्लीतील काही मालमत्तांचाही समावेश आहे. या मालमत्तांची किंमत 1400 कोटींहून अधिक आहे. या मालमत्ता बेनामी पैशाने खरेदी केल्या नाहीत, हे सिद्ध करण्यासाठी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांकडे आता फक्त 90 दिवसांचा अवधी आहे.

आदेशात कोणती मालमत्ता जप्त करण्याचा उल्लेख?

Advertisement

▪️ जरंडेश्वर साखर कारखान्याचा समावेश- बाजार मूल्य 600 कोटी
▪️ दक्षिण दिल्लीतील 20 कोटी रुपयांचा फ्लॅट
▪️ पार्थ पवार यांचे सुमारे 25 कोटी रुपयांचे निर्मल कार्यालय
▪️ गोव्यातील 250 कोटी रुपयांचे ‘निलय’ रिसॉर्ट
▪️ पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील विविध 27 ठिकाणच्या जमिनींचा यात समावेश आहे. त्याचे बाजारमूल्य सुमारे 500 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

▪️ माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीकडून अटक

Advertisement

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (NCP’s Anil Deshmukh) सोमवारी सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले आणि मध्यरात्रीनंतर त्यांना अटक करण्यात आली. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुली आरोपांवरून (100 crore recovery case) ही कारवाई करण्यात आली.

काल सोमवारी अनिल देशमुख हे ईडी कार्यालयात सकाळी 11:30-12.00 वाजे दरम्यान त्यांच्या वकीलासोबत चौकशीला हजर झाले. त्यांची तब्बल 13 तास चौकशी करता करता मध्यरात्री 1 वाजेनंतर त्यांना अटक करण्यात आली. अनिल देशमुख चौकशीला कोणत्याही प्रकारे सहकार्य करत नव्हते, अशीही माहिती आहे. मनी लाँड्रिंगच्या अनुषंगानं ही सर्व कारवाई करण्यात आल्याचं समजतंय. तरी आज 2 नोव्हेंबरला त्यांना ईडीच्या (ED) कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे.

Advertisement

पुढचा नंबर कोणाचा? किरीट सोमय्यांचं धक्कादायक ट्विट

काल रात्री अनिल देशमुखांना अटक झाल्यानंतर, “अखेर अनिल देशमुख यांना अटक केली असून 100 कोटींहून अधिक गैर पारदर्शक व्यवहार’, असं ट्विट करून “अनिल देशमुख आणि नंतर आता अनिल परब यांचा नंबर आहे”, अशा प्रकारचं विधान किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर या प्रकरणात पुढं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement