दिवाळी सणाची अनेक लोक आतूरतेने वाट पाहात असतात. कोरोनाची भिती कमी झाल्याने, निर्बंध कमी झाल्याने यंदा दिवाळीचा सण सगळेच धुमधडाक्यात साजरा करणार आहेत. दिवाळीला नव्या वस्तू आणि कपडे अनेक लोक खरेदी करतात. दिवाळीमध्ये (Diwali Festival) आकर्षक दिव्यांनी केलेल्या रोषणाईने आणि घराबाहेर काढलेल्या रांगोळ्यांने मन प्रसन्न होते.
दिवाळीत धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज या दिवसांना विशेष महत्व आहे. जाणून घेऊया कोणते दिवस कधी येणार..
वसुबारस- सध्या यावर्षी आज म्हणजेच सोमवारी (1 नोव्हेंबर) प्रदोषकाली आश्विन कृष्ण द्वादशी आहे आणि आजच ‘गोवत्स द्वादशी-वसुबारस’ ही आहे. गोवत्सद्वादशीलाच कोकणात वसूबारस असे म्हणतात. वसुबारसेपासून दिवाळीला सुरुवात होते, असं मानतात.
धनत्रयोदशी- वसुबारसनंतर मंगळवार, दि. 2 नोव्हेंबरला नोव्हेंबर रोजी प्रदोषकाळी आश्विन कृष्ण त्रयोदशी असल्याने धनत्रयोदशी आहे. म्हणून या दिवशी परंपरा मानून लोक धन आणि दागिने यांची पूजा करतात. व्यापारी असणारे लोक नवीन वर्षासाठी हिशोब लिहीण्यासाठी वह्या घेऊन करून पूजा करतात.
नरक चतुर्दशी- धनत्रयोदशीनंतर 4 नोव्हेंबरला गुरुवारी नरक चतुर्दशी अर्थातच लक्ष्मीपूजन आहे. संध्याकाळी 6.03 वाजेपासून रात्री 8.35 वाजेपर्यंत लक्ष्मीकुबेर पूजन करायचे आहे. दिवाळीची पहिली आंघोळ या दिवशी करतात. म्हणूनच नरकचतुर्दशी ला खूप महत्व आहे. या दिवशी दर्श अमावस्याही आहे. या दिवशी चंद्रोदयापासून (पहाटे 5.49 वाजता) सूर्योदयापर्यंत (संध्याकाळी 6.02 वाजता) अभ्यंगस्नान करावे.
दिवाळी पाडवा- लक्ष्मीपूजनानंतर (Worship of Laxmi) 5 नोव्हेंबरला दिवाळी पाडवा (Diwali Padwa) आहे. या दिवशी काही नवीन वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं. दसऱ्यानंतर दिवाळी पाडवा हा उद्योगधंदा सुरू करण्यासाठी चांगला मुहूर्त मानला जातो. पती-पत्नीचे नाते वृद्धींगत व्हावे यासाठी पाडवा सणाला विशेष महत्व आहे. या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. तसेच या दिवशी बलिप्रतिपदा असल्याने बलीची पूजा केली जाते.
भाऊबीज- या सणाचं आणि आपलं नातं अतूट आहे. यंदा 6 नोव्हेंबरला यावर्षी भाऊबीज (Bhaubij) आहे. बहीण- भावंडांचा दिवस. बहिण भावाला ओवाळते. तसेच आजकाल बहिण- भावंडे मिळून दिवाळीच्या सणांना मामाच्या गावाला जाऊन सर्वजण भेटतात.
…म्हणून दिवाळीला दिवे लावतात
दिवाळीला प्रकाशाचा आणि दिव्यांचा उत्सव मानले जाते. या सणांमध्ये घराबाहेर दिवे लावून आकर्षक रोषणाई करतात. दिवाळीला आपल्या घराबाहेर दिवे (Lights) लावण्यामागे खास कारण आहे. श्रीरामांनी कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथीला रावणाचा वध केला आणि ते अयोध्येला पुन्हा परतले. श्रीराम यांच्या अयोध्येला येण्याच्या आनंदात अयोध्यामधील लोकांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते, असं म्हणतात. त्यामुळे दिवाळीला पुरातन काळात दिवे लावण्याची परंपरा होती.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511