SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

देशातील 46 रेल्वेस्थानके बाॅम्बने उडविण्याची धमकी, दहशतवाद्यांच्या पत्राने देशभर खळबळ…!

देशभर दिवाळी सणाला आजपासून सुरुवात झाली. मात्र, लोकांच्या आनंदावर विरजण घालणारी एक बातमी आहे. कुख्यात दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’ने (Lashkar-e-Toiba) देशातील 46 रेल्वे स्थानके बाॅम्बने उडविण्याची धमकी दिलीय. त्यामुळे देशभर एकच खळबळ उडाली आहे.

रेल्वे सुरक्षा दल आणि ‘जीआरपी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘लष्कर-ए-तोयबा’च्या एरिया कंमाडरच्या नावाने हे धमकीचे पत्र आलंय. त्यात दिवाळीच्या तोंडावर देशातील विविध रेल्वेस्थानकांत बॉम्बस्फोट घडवून आणणार इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे या रेल्वे स्थानकांमध्ये लखनऊ, अयोध्या, कानपूर, वाराणसीसह उत्तर प्रदेशातील 46 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. त्यामुळे रेल्वे विभागात भीतीचे वातावरण आहे. उत्तर प्रदेशातील सर्व रेल्वे स्थानकांतील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

रेल्वेस्थानकांतील सुरक्षा वाढविली
रेल्वेस्थानकात काहीही संशयास्पद वाटल्यास त्याची कसून तपासणी करावी, त्यात कोणताही हलगर्जीपणा करू नये, अशी सूचना ‘आरपीएफ’ आणि ‘जीआरपी’च्या जवानांना देण्यात आली आहे.. दिवाळीच्या दरम्यान ट्रेनमध्ये मोठी गर्दी असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनासह सुरक्षा दलाचीही चिंता वाढली आहे.

Advertisement

वास्तविक, रेल्वे प्रशासनाला अशा प्रकारची धमकी मिळाल्याची ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशा धमक्या आल्या आहेत. मात्र, तरीही याबाबत सतर्कता बाळगली जात आहे. संबंधित रेल्वे स्थानकात येणाऱ्या, तसेच येथून सुटणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

एटीएस चौकशी करणार..
दहशतवादविरोधी पथकाकडून (ATS) या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. ‘लष्कर-ए-तोयबा’च्या नावाने हे धमकीचे पत्र कोणी पाठविले आहे का, त्यामागील नेमकं सत्य काय आहे, या संपूर्ण प्रकरणाची ‘एटीएस’ चौकशी करणार आहे.

Advertisement

‘एटीएस’ सर्व पैलूंवर लक्ष ठेवून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. प्रवाशांनीही सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement