SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

GK: FSSAI म्हणजे काय? अन्नपदार्थात भेसळ झाली, तर तक्रार कशी करायची? वाचा..

ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना स्वयंरोजगार उपलब्धतेच्या दृष्टीने हॉटेल व्यवसायाचा वाटा मोठा आहे. मात्र आपण अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ विकत असाल किंवा हॉटेल किंवा खाद्यगृह सुरु कराल तेव्हा प्रत्यक्ष कायद्याने नोंदणी करणेही महत्वाचे व बंधनकारक आहे.

FSSAI काय आहे?

Advertisement

FSSAI भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण ही संस्था आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांची स्वायत्त संस्था आहे. जे पदार्थ खाण्यासाठी वापरले जातात त्या प्रत्येक पदार्थांची विक्री करण्यापूर्वी त्यांची विक्री करण्याची परवानगी केंद्र सरकारने सक्तीची केलेली आहे, अशा परवानगी शिवाय कोणतेही खाद्यपदार्थ विकणे,साठविणे,उत्पादन करणे बेकायदेशीर असून अशी बेकायदेशीर कृती करणारांवर गुन्हेही दाखल होऊ शकतात. यासाठी भारतीय खाद्य सुरक्षा एवं मानक प्राधिकरण (FSSAI) हे खाद्यपदार्थ विक्रीचा परवाना देतात. सोबत एक 14 अंकांचा नोंदणी किंवा परवाना क्रमांक पॅकिंग छापलेले किंवा व्यवसायाच्या आवारात दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे गरजेचे आहे.

भेसळयुक्त पदार्थ बनवणार्‍या व विकल्या जाणार्‍यांवर योग्य कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) ही संस्था आहे. अन्न व औषध प्रशासनची स्थापना 1970 रोजी झाली आहे. महाराष्ट्र राज्य शासना महाराष्ट्रातील नागरिकांचे भेसळयुक्त व अयोग्य अन्नपदार्थ व औषधे, पेये भेसळमुक्त तसेच नागरिकांसाठी वापरण्यास सुरक्षित आहेत ह्याची खबरदारी घेण्याची जबाबदारी ही संस्था घेते.

Advertisement

तक्रार दाखल करताना…

तक्रार दाखल करण्‍याकरता आणि दाद मिळविण्‍यासाठीची पद्धत अत्‍यंत सोपी आहे. याकरता तुम्ही फक्त उचित मंच/ आयोग यांच्‍याकडे ग्राहकाला आपली लेखी तक्रार आवश्‍यक प्रतीसह प्रत्‍यक्ष किंवा टपालाने पाठविता येते. रतक्रार करण्‍यासाठी वकिलाच्‍या मदतीची गरज असतेच असे नाही

Advertisement

अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणार्‍या व्यक्तीवर होणार कारवाई

अन्नपदार्थांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांची भेसळ करण्याचं प्रमाण सध्या वाढलं आहे. अन्नभेसळीस रोखण्यासाठी देशातील केंद्र शासनाने ‘अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा-1954’ अंमलात आणला आहे. इ.स. 1955 सालापासून या कायद्यामधील त्रुटी घालवून व योग्य त्या तरतुदी करून त्याची सर्व राज्यांत अंमलबजावणी करण्यात आली आहे. आरोग्याला नुकसानकारक भेसळीबाबत न्यायालयात खटले दाखल करण्यासाठी तशी तरतूद या कायद्यात आहे. नवीन कायद्यात अन्न निरीक्षक यांच्याऐवजी अन्न सुरक्षा अधिकारी असे नमुने घेणार्‍या व संस्थांची तपासणी करणार्‍या अधिकार्‍याला म्हटले जाते. तसेच या अधिकार्‍यांकडून रु. 10 लाखांपर्यंत दंड देखील ठोठावण्यात येतो. अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 शिवाय अन्नपदार्थांवर नियंत्रणासाठी ऍगमार्क, बी.आय.एस., भारतीय दंड संहिता (कलम 272, 273) हे कायदे आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement