SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..


🗓️ रविवार, 31 ऑक्टोबर 2021

मेष (Aries) : आत्मविश्वास वाढीस लागेल. ग्रहांची अनुकूलता लाभेल. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. तांत्रिक ज्ञान वाढीस लागेल.

वृषभ (Taurus) : तरुणांनी आळशीपणा करू नये. कौटुंबिक चर्चेला महत्त्व द्यावे. सामाजिक भान ठेवणे हिताचे. ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे.

मिथुन (Gemini) : घरगुती वातावरणाकडे लक्ष ठेवा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नकोच. आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. मुलांचा खोडकरपणा वाढेल.

कर्क (Cancer): मनातील नकारात्मक विचार वेळीच रोखा. तरुणांना करियर विषयाची चिंता सतावेल. बौद्धिक ताण घेऊ नका. कामात तत्परता दाखवावी.

सिंह (Leo) : जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा. झोपेची तक्रार जाणवेल. खर्चाला वाटा फुटू शकतात. प्रियजनांशी भेटी होतील.

कन्या (Virgo): कुटुंबात अशी एखादी घटना घडेल की तुम्हाला दुःख होईल. अस्वस्थ रहाल. मन व्यग्र राहील. नकारात्मक विचारांमुळे तुम्हाला जास्तच भास होतील.

तूळ (Libra) : तन-मनाला सुख- आनंद मिळेल. कुटुंबियां समवेत उत्साह व आनंदात वेळ घालवाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळाल्याने मनाला आनंद होईल.

वृश्चिक (Scorpio) : लाभ होण्याचा आज योग आहे असे श्रीगणेश सांगतात. मित्र आणि स्नेही यांच्या भेटीतून लाभ होईल. विवाहोत्सुकांचे विवाह सहज जुळतील.

धनु (Sagittarius) : आज आपल्याला अनुकूल दिवस आहे, असे श्रीगणेश सांगतात. आपले प्रत्येक काम सहजगत्या पार पडेल. काही गोष्टींचे चिंतन करून पाहावे.

मकर (Capricorn) : आनंदी राहाल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. त्यामुळे मोठे यश मिळू शकेल. शुभ प्रसंगाचे आयोजन घडेल.

कुंभ (Aquarius) : मातेचे आरोग्य बिघडेल. शांत झोप लागणार नाही. शेअर्स मधून लाभ संभवतो. नियोजित व्यवहारात काटेकोरपणा ठेवावा.

मीन (Pisces) : महत्त्वाची कामे आधी पार पाडावीत. मनाची उदासीनता दूर सारावी. जोखीम घेताना सावध रहा. मौल्यवान वस्तु काळजीपूर्वक ठेवाव्यात.

Advertisement