बॉलिवू़डमध्ये यंदा लगीनघाई जोरात सुरु आहे. आलिया व रणबीर कपूर, कतरिना व विकी कौशल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्यात आणखी एका बाॅलिवूड अभिनेत्याची भर पडली आहे. हा अभिनेता आहे, राजकुमार राव..!
सध्या राजकुमार राव याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार राव येत्या 10 नोव्हेंबरला गर्लफ्रेंड पत्रलेखा हिच्यासोबत सात फेरे घेणार असल्याचे समोर येत आहे. फक्त काही जवळच्या मित्रांनाच त्यांच्या लग्नात सहभागी होता येणार आहे.
राजकुमार राव व पत्रलेखा हे लव्हबर्ड्स गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. अनेक दिवसांपासून ते ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते. एकमेकांबद्दल ते सतत प्रेम व्यक्त करताना दिसतात. सोशल मीडियावरही राजकुमारने अनेकदा चित्रलेखाविषयी प्रेम व्यक्त केल्याचे दिसले होते.
अखेर येत्या 10 नोव्हेंबरला हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. या सोहळ्यात या दोघांचे कुटुंबीय, जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. राजकुमार रावने चाहत्यांना आमंत्रण पाठवले आहे. सध्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे.
लग्न-मुलांबद्दल बोलत नाही..
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत राजकुमार राव याने आपल्या गर्लफ्रेंडबाबत खुलासा केला होता. तो म्हणाला, की गर्लफ्रेंड पत्रलेखाशी लग्न आणि मुलांबद्दल काही बोलत नाही. ती माझी चांगली मैत्रीण आहे. आम्ही सिनेमाबद्दल चर्चा करतो नि आम्हाला अभिनय आणि प्रवास आवडतो.
राजकुमारच्या चित्रपटाला पसंती
दरम्यान, राजकुमार राव नुकताच ‘हम दो-हमारे दो’ चित्रपटात दिसला होता. क्रिती सेननसोबत त्यांच्या जोडीला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली. हे दोघे नुकतेच अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’मध्येही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिसले होते.
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511