SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पत्नीला दरमहा पैसे ट्रान्सफर केल्यास आयकर विभागाची नोटीस..? नियम काय सांगतो, वाचा..!

बहुतेक नागरिक घराची सगळी जबाबदारी गृहिणीवर सोपवून आपल्या कामाच्या व्यापात बुडालेले असतात. आता घर चालवायचे म्हणजे, पैसे तर लागणारच ना.. घरखर्चासाठी काही पुरुष पत्नीच्या बँक खात्यावर दर महिन्याला काही पैसे ट्रान्सफर करीत असतात.

सध्या डिजिटली पेमेंट सोय झाल्याने अनेक जण अशाच प्रकारे पत्नीला दर महिन्याला पैसे ट्रान्सफर करीत असतात. असे पैसे ट्रान्सफर करण्यात काय ते गैर..? मात्र, थांबा.. तुम्हीही असे करीत असल्यास ‘इन्कम टॅक्स’ विभागाची नोटीस मिळू शकते..

Advertisement

वाचून धक्का बसला ना.. नेमका हा काय प्रकार आहे..? खरेच आयकर विभागची अशी नोटीस येऊ शकते का, असे प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील, तर चला याबाबत जाणून घेऊ या..

पत्नीला कधी येऊ शकते नोटीस..?
घरखर्चासाठी वा आता दिवाळी, धनत्रयोदशी वा इतर कोणत्याही विशेष प्रसंगी भेट म्हणून पत्नीला ५ ते १० हजार रुपये दिल्यास, त्यावर आयकर लागू होत नाही. ही रक्कम पतीची मिळकत मानली जाते. त्यावर पत्नीला कर भरावा लागणार नाही. त्यासाठी आयकर विभागाची नोटीसही येणार नाही.

Advertisement

…. तर पतीने दिलेले पैसे पत्नीने कुठे तरी वारंवार गुंतविले, त्यातून ती उत्पन्न मिळवित असेल, तर असे उत्पन्न करपात्र ठरते. हे उत्पन्न पतीचे नाही, तर पत्नीचे ठरते. त्यामुळे पत्नीला त्यावर कर भरावा लागेल.

इन्कमटॅक्स कायद्यानुसार, पतीच्या उत्पन्नातून पत्नीला गिफ्ट म्हणून काही पैसे देत असतील, तर ते कायदेशीररित्या चुकीचे ठरत नाही. मात्र, त्यावर करातून सूट मिळणार नाही. हे गिफ्टचे पैसेही तुमचे उत्पन्न समजले जाणार आहे. त्यामुळे त्यावर कर भरावाच लागेल..

Advertisement

पत्नी जर पतीकडून दरमहा काही पैसे घेऊन ते एसआयपी (SIP) द्वारे म्युच्युअल फंडांत गुंतवित असेल, तर तिला इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची गरज नाही. तसेच, त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. या पैशाच्या गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न पतीच्या करपात्र उत्पन्नात जोडले जाणार आहे.

पत्नीने या उत्पन्नातून पुन्हा गुंतवणूक करीत कमाई केली, तर मात्र तिला यावर कर भरावा लागणार आहे. अशा वेळी पत्नीच्या नावे आयकर न भरल्यास आयकर विभागाची नोटीस येऊ शकते.

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

 

Advertisement

 

Advertisement