SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आधार कार्डमध्ये किती वेळा बदल करता येतात, त्यासाठीची प्रोसेस काय, जाणून घेण्यासाठी वाचा..!

आधार कार्ड हा प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक नि महत्त्वाचा ओळखीचा पुरावा. आधार कार्डशिवाय आता कोणतेही सरकारी काम होत नाही. मग ते बँकखाते उघडायचे असो, वा सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो, की गॅस सिलिंडरचे अनुदान.., आधारकार्ड प्रत्येक ठिकाणी अनिवार्य झालेय.

आधार कार्ड तयार करताना, अनेकदा नजरचूकीने काहीतरी राहून जाते नि मग नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. काही वेळा आधार कार्डमधील नाव चुकते, तर कधी पत्ता किंवा मोबाईल नंबर..! झालेली चूक नंतर निस्तारत बसण्यापेक्षा आधार कार्ड काढतानाच आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे.

Advertisement

अर्थात झालेली चूक दुरुस्तही करता येते. मात्र, त्यासाठीही काही मर्यादा आहेत. वारंवार अशा चुका झाल्यास आधारकार्ड अपडेट होणे मुश्किल होते. आधार कार्ड किती वेळा अपडेट करता येते, त्यासाठी काय करावे लागते, याबाबत जाणून घेऊ या…

आधार कार्डमध्ये एखादी चुक झाल्यास अनेक कामे थांबू शकतात. छोटीसी चूकही मोठी समस्या निर्माण करु शकते. मात्र, जन्मतारीख ते नाव, पत्ता दुरुस्त करणे सोपे आहे. परंतु त्याला काही मर्यादा असून, ते समजून घेणे महत्त्वाचे आहे.

Advertisement

किती वेळा आधार कार्ड अपडेट होते..?
नावातील बदल : फक्त दोनदा
लिंग : फक्त एकदा
जन्मतारीख : एकदाच (जन्मतारखेतील बदल केवळ असत्यापित जन्मतारखेसाठी अपडेट केला जाऊ शकतो.)

आधार कार्ड कसे अपडेट करायचे..?
आधार कार्डवरील नावात, जन्मतारखेत वा लिंग चुकीचे लिहिले गेले असल्यास ते अपडेट करता येते. त्यासाठी आधार नावनोंदणी / अपडेटेशन केंद्रात जावे लागते.

Advertisement

आधार अपडेट करण्याची मर्यादित संख्या ओलांडली असल्यास नावनोंदणी केंद्रावरील अपडेट स्वीकारण्यासाठी UIDAI च्या प्रादेशिक कार्यालयास ई-मेल किंवा पोस्टाद्वारे अर्ज करावा लागेल.

त्यासाठी URN स्लिपची प्रत, आधार तपशीलांशी संबंधित कागदपत्रे आणि तपशील संपादित करणे आवश्यक आहे. या तपशीलांसह [email protected] या ई-मेलवर पाठवू शकता. त्यानंतर तुम्हाला आधारच्या प्रादेशिक कार्यालयातून मेल येतो.

Advertisement

गरज पडल्यास आधारच्या प्रादेशिक कार्यालयात बोलावले जाऊ शकते. UIDAI प्रथम तुमची कागदपत्रे तपासते. सर्व कागदपत्रे बरोबर असल्यास आधार कार्डमध्ये आवश्यक ते बदल करुन नव्याने कार्ड दिले जाते.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement