SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

टीम इंडियाचा न्युझीलंडविरुद्धही दारुण पराभव, सेमी फायनलसाठी आता असे असेल गणित..

न्यूझीलंड गोलंदाजीच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर टीम इंडियाची तगडी बॅटिंग ढेपाळली. नंतर बाॅलिंगमध्येही भारतीय संघाला विशेष कामगिरी करता आला नाही. न्युझीलंड विरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. त्यामुळे आता भारतीय संघाची वाटचाल अवघड झालीय.

कर्णधार केन विल्यमसनने भारताविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने दोन बदल केले. सूर्यकुमार यादव व भुवनेश्वर कुमार यांच्याऐवजी इशान किशन व शार्दूल ठाकूर यांचा संघात समावेश केला होता. न्यूझीलंडने टीम सैफर्टऐवजी अॅडम मिल्नेला संधी दिली.

Advertisement

भारतीय संघ व्यवस्थापनाने रोहित शर्माऐवजी इशान किशनला सलामीला पाठविण्याचा धाडसी निर्णय घेतला. मात्र, इशानला (४) फार काही करता आले नाही. त्यानंतर के. एल. राहुलही (१८) बाद झाला.

तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या रोहित शर्माला पहिल्याच चेंडूवर अॅडम मिल्नने जीवदान दिले होते. मात्र, त्यानंतरही रोहित मोठी खेळी करू शकला नाही. ईश सोधीने त्याला 14 धावांवर बाद केले.

Advertisement

ईश सोधीला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विराट कोहली (९) फसला. अॅडम मिल्नने ऋषभ पंतला (१२) त्रिफळाचीत केले. हार्दिक पांड्याला (२३) मोठे फटके मारता येत नव्हते. रवींद्र जडेजाने 19 चेंडूत 26 धावांची खेळी केल्याने भारतीय संघाने किमान शंभरी तरी ओलांडली.

भारतीय संघाने दिलेल्या 110 धावांचा पाठलाग न्युझीलंड संघाने आरामात केला. त्यात जसप्रित बुमराह (२ विकेट) वगळता कोणालाच विकेट मिळाली नाही.

Advertisement

न्यूझीलंड अपराजितच..
2019 मध्ये झालेल्या वन-डे विश्वचषकात न्यूझीलंडने भारताला उपांत्य फेरीत नमवलं होतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम मुकाबल्यातही न्यूझीलंडने भारताला हरवलं. टी-20 विश्वचषकात ३ सामने आता न्यूझीलंडने जिंकले आहेत.

सेमी फायनल गाठणे अवघड..
न्युझीलंडविरुद्ध पराभव झाल्याने भारतीय संघासाठी सेमी फायनल गाठणे अवघड झाले आहे. पाकिस्तान संघाने सगळे सामने जिंकल्याने ते टाॅपवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर अफगाणिस्तान संघ आहे. आता भारताने सगळे सामने जिंकले, तरी अन्य संघाच्या निकालावर लक्ष ठेवावे लागणार आहे.

Advertisement

तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 9700111511 

Advertisement