SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

व्हॉट्सअ‍ॅप देणार 51 रुपये कॅशबॅक, तुम्हाला करावं लागणार फक्त ‘हे’ काम…

व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट (WhatsApp Payment) हे नवं फीचर सुरू केलं असून व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट या सुविधेचा वापर जास्तीत जास्त व्हॉट्सअ‍ॅप युजर्सने करावा, यासाठी व्हॉट्सअ‍ॅपकडून काही धमाकेदार ऑफर्स दिल्या जात आहेत.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार..

Advertisement

व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना WhatsApp Payments वर कॅशबॅकची ऑफर दिली जात आहे. WhatsApp Payments ने ऑनलाईन व्यवहार (Online Trascaction) केल्यास 51 रूपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. व्हॉट्सअ‍ॅपने ‘Give Cash, Get 51 back’ या नावाने एक बंपर ऑफर सुरू केली आहे. त्या माध्यमातून युजर्सला पेमेंट करून या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.

यामध्ये तुम्ही पाच वेगवेगळ्या काँटॅक्ट्सना (संपर्क क्रमांकांना) पैसे पाठवून जास्तीत जास्त 5 वेळा 51 रुपयांचा कॅशबॅक प्राप्त करू शकता. फक्त लक्षात ठेवा, तुम्ही पैसे पाठवण्यासाठी निवडलेल्या प्रत्येक संपर्कासाठी तुम्हाला फक्त एकच कॅशबॅक रिवॉर्ड मिळेल. व्हॉट्सअ‍ॅपने या कॅशबॅक ऑफरसाठी कोणतीही रक्कम मर्यादा सेट केलेली नाही. त्यामुळे WhatsApp Payment द्वारे समजा तुम्ही फक्त 10 रुपये जर पाठवले तरी तुम्हाला त्वरित 51 रुपयांचा कॅशबॅक मिळेल, अशी माहीती आहे.

Advertisement

सध्या ही ऑफर फक्त Android च्या बीटा यूजरसाठी उपलब्ध आहे. लवकरच ही ऑफर इतर युजर्ससाठीही खुली करणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. पेमेंट केल्यानंतर लगेच तुमच्या खात्यात 51 रुपयांचा कॅशबॅक ट्रान्सफर केला जाईल असे कंपनीने सांगितले आहे. व्हॉट्सअ‍ॅपने या सेवेसाठी व्हॉट्सअ‍ॅप मेसेज बॉक्सच्या बाजूला रुपयाचे चिन्ह (₹) दिले आहे. जेणेकरून पेमेंट करणे सोप्पे होईल. ही सेवा युपीआय आधारीत असल्यामुळे तुम्ही कोणत्याही बँकेचे अकाऊंट याला जोडू शकता आणि इतर पेमेंट अ‍ॅप्सप्रमाणे पेमेंट करू शकता.

कॅशबॅकसाठी पात्र होण्यासाठी…

Advertisement

▪️ तुम्ही ज्या कॉन्टॅक्ट्सला पैसे पाठवत आहात तो व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्ता नसेल, तर त्यांना व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप इंस्टॉल करण्यास सांगा.

▪️ तुम्ही निवडलेल्या कॉन्टॅक्ट्सने WhatsApp वर हे फीचर वापरण्यासाठी नोंदणी केली नसेल, तुम्ही पैसे पाठवण्याआधी त्यांना नोंदणी करण्यास सांगा.

Advertisement

▪️ तुम्ही कमीत कमी 30 दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल, तर तुम्हाला हा कॅशबॅक मिळू शकतो. WhatsApp Business वापरकर्ते या कॅशबॅकसाठी पात्र नाहीत.

▪️ व्हॉट्सअ‍ॅप वर ‘पेमेंट्स’ फीचर वापरण्यासाठी यूजरने भारतामध्ये नोंदणी केली असावी. तुम्ही अजूनही तुमचे बँक खाते जोडले नसल्यास तुम्ही तुमच्या बँक खात्याचे तपशील जोडून WhatsApp वर ‘पेमेंट्स’ हे फीचर वापरू शकता.

Advertisement

तुमचे बँक खाते जोडण्यासाठी आवश्यक बाबी:

व्हॉट्सअ‍ॅप वापरणारे आणि पेमेंट्स फिचरचा वापर करण्यासाठी तुमच्याकडे UPI (Unified Payment Interface – युनिफाइड पेमेंट इंटरफेस) ला सपोर्ट करणारे सक्रिय भारतीय बँक खाते, या बँक खात्याला लिंक असलेला मोबाईल नंबर व तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटचा मोबाईल/फोन नंबर एकच असला पाहिजे.

Advertisement

तुमचं बँक अकाऊंट कसं लिंक करायचं?

▪️ व्हॉट्सअ‍ॅपच्या मेन स्क्रीनवर ऑप्शन्समध्ये जाऊन ( …) अशा उभ्या डॉट्सवर क्लिक करून पेमेंट्स (Payments) वर क्लिक करून प्रोसेस सुरू करू शकता किंवा ज्या कॉन्टॅक्टला पैसे पाठवायचे असतील, त्या व्यक्तीच्या चॅटवर जाऊन पेमेंट्स (Payments – ₹) पर्यायावर क्लिक करा.

Advertisement

▪️ त्यानंतर तुमचे बँक खाते जोडा (Add Bank Account) वर टॅप करा. आणि आता सुरू करा ( Get Started) क्लिक करा. मग ‘आमचे पेमेंट्स अटी आणि गोपनीयता धोरण स्वीकारण्यासाठी स्वीकार करा व पुढे सुरू ठेवा’ (Accept & Continue) वर टॅप करा.

▪️ त्यानंतर तुम्हाला बॅंकांची यादी दिसेल, त्यातून तुमची बॅंक निवडा, ज्यामध्ये तुमचे अकाऊंट असेल आणि मोबाईल नंबर रजिस्टर्ड असेल. बँक निवडल्यावर नंबर व्हेरिफाय (Verify) करा. आता तुमच्या मोबाईल नंबरवर एसएमएस (मेसेज) येईल. आता त्या एसएमएसद्वारे तुमचा मोबाईल नंबर पडताळून झाल्यावर अनुमती द्या वर टॅप करा.

Advertisement

▪️ व्हॉट्सअ‍ॅपला फोन कॉल्स करण्याची आणि ते व्यवस्थापित करण्याची अनुमती (Permission) आधीपासूनच दिली असल्यास, तुम्हाला परवानगी देण्याची गरज लागणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपवरून पेमेंट पाठवण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी (Send & Receive) जे बॅंक खाते जोडायचे आहे, त्या बॅंक खात्यावर टॅप करा. पूर्ण झाले यावर टॅप करा.

👉 तक्रार असल्यास: WhatsApp वरून केल्या जाणाऱ्या पेमेंट्सविषयी संपर्क करायचं असल्यास, सोमवार ते रविवार, सकाळी 7.00 ते संध्याकाळी 8.00 या भारतीय (IST) प्रमाणवेळेत 1800-212-8552 या नंबरवर कॉल करा.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement