SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ शनिवार, 30 ऑक्टोबर 2021

मेष (Aries) : धनप्राप्तिच्या दृष्टिने योग्य दिवस. मित्राची अचानक झालेली भेट आनंददायी ठरेल. मित्रांकडून लाभ होईल. प्रकृतीची काळजी घ्या.

Advertisement

वृषभ (Taurus) : प्रलंबित कामे मार्गी लागतील. सामाजिक गोष्टींचे भान राखावे. अनुकूलतेचा सदुपयोग करावा. आहारावर नियंत्रण ठेवा. झोपेची तक्रार जाणवेल.

मिथुन (Gemini) आज आपणाला सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. आज घडणार्‍या घटनांमुळे आपण काळजीत पडाल. संशोधन वृत्ती डोके वर काढेल.

Advertisement

कर्क (Cancer): आपले स्वास्थ्य बिघडेल आणि डोळ्याचे विकार बळावतील. घरातील व्यक्तींचा विरोध आणि रुसवा याला तोंड द्यावे लागेल.

सिंह (Leo) : अतिगोड पदार्थ खाणे टाळा. आज धार्मिक तसेच मंगल कार्यात तुम्ही मग्न रहाल. धार्मिक प्रवास घडतील.

Advertisement

कन्या (Virgo): आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको. तुमच्याबाबतचे गैरसमज दूर होतील. नवीन कामाचा शुभारंभ करण्यास दिवस उत्तम.

तूळ (Libra) : जोडीदाराकडून चांगला लाभ होईल. चिंतेची छाया दूर झाल्याने मानसिक स्वास्थ्य मिळेल. कार्य सिद्धीस साशंकता नको. प्रश्नांची सरबत्ती होईल.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : व्यक्तिमत्वातून व बोलण्यातून चांगली छाप पाडा. आर्थिक मिळकतीत वाढ होईल. हातातील कामे पूर्णत्वास जातील.

धनु (Sagittarius) : आज आपली वृत्ती रागीट असेल. दिवसाचा पूर्वार्ध मजेत जाईल. जुनी देणी चुकवून टाका. शक्यतो वरिष्ठांना नाराज करू नका.

Advertisement

मकर (Capricorn) : अंगीभूत कलेला वेळ द्यावा. धनसंचय वृद्धिंगत होईल. मित्रांची भेट मन प्रसन्न करून देईल. मानसिक शांततेला अधिक महत्व द्याल.

कुंभ (Aquarius) : नोकरदार वर्गाला विशेष लाभ मिळण्याची शक्यता. स्व-कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. आजचा दिवस आपणाला लाभदायक आहे.

Advertisement

मीन (Pisces) : अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल. समोरच्याला आपण होऊन मदत कराल. बोलण्यातून कर्तृत्व सिद्ध कराल. आळस झटकून टाका.

 

Advertisement