SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

या बॅंकेने 44 कोटी खातेदारांना केलंय अलर्ट, तुम्हाला आलाय असा मेसेज, जाणून घेण्यासाठी वाचा..

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) आपल्या खातेदारांसाठी महत्वाचा अलर्ट जारी केला आहे. आपल्या ग्राहकांना फिशिंग, हॅकिंग वा फसवणुकीसारख्या प्रकारापासून वाचवण्यासाठी एसबीआयने हा अलर्ट जारी केला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये विविध बॅंकांच्या ग्राहकांना गंडा घालण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून आले आहे. संवेदनशील माहितीच्या माध्यमातून या ग्राहकांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आलेय.

Advertisement

आपल्या ग्राहकांना सुरक्षित बँकिंग सेवा देण्यासाठी ‘एसबीआय’ने अनेक सेवा-सुविधा सुरु केल्या आहेत.. जेणेकरुन आर्थिक गरजांसोबतच खातेदारांच्या सुरक्षेबाबतची काळजी घेतली जाऊ शकते. बॅंकेच्या 44 कोटी ग्राहकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

ग्राहकांना पाठविलेले मेसेज बँकेनेच पाठवले आहेत की नाही, यासाठी ‘एसबीआय’ने ट्विट करुन काही टिप्स दिल्या आहेत..  त्यात म्हटले आहे, की ग्राहकांनी मेसेज पाहताना नेहमी SBI/SB ने सुरू होणारे शॉर्ट कोड तपासावेत.. उदा. SBIBNK, SBIINB, SBIPSG आणि SBINO.

Advertisement

कस्टमर केअर नंबर
अज्ञात स्त्रोतांकडून आलेल्या मेसेजला कोणताही रिप्लाय करु नये. शिवाय ‘एसबीआय’ने कस्टमर केअर नंबरही जारी केला आहे. 1800 11 2211, 1800 425 3800 किंवा 080 26599990 या क्रमांकावर संपर्क साधून बॅंकेबाबत कोणतीही माहिती मिळविता येणार आहे.

Advertisement

एटीएमसाठी ओटीपी पद्धत लागू
एटीएम द्वारे केले जाणारे व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी एसबीआयने ‘ओटीपी’ पद्धत आणली आहे. त्यामुळे आता ग्राहक केवळ मोबाईलवर आलेला ‘ओटीपी’ टाकल्यावरच ‘एटीएम’मधून पैसे काढू शकतील. त्यामुळे ‘एटीएम क्लोनिंग’ किंवा इतर फसवणूक होणार नसल्याचे सांगण्यात आले.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement