SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गॅस सिलिंडरसाठी आता ओटीपी येणार.., यासह एक नोव्हेंबरपासून बदलणार अनेक नियम, सामान्यांच्या जीवनावर पडणार मोठा परिणाम..

ऑक्टोबर महिना संपायला अवघा एक दिवस राहिलाय. येत्या सोमवारपासून नोव्हेंबर महिन्याला सुरूवात होईल. दर महिन्याचा एक तारखेला विविध क्षेत्रात काही ना बदल होत असतात. तसेच बदल येत्या १ नोव्हेंबरपासूनही होणार आहे..

देशभरात 1 तारखेपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. या बदलाचा थेट सामान्यांच्या खिशावर, त्यांच्या आयुष्यावर परिणाम होणार आहे. बँकांमध्ये पैसे जमा करणे, पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क, तसेच रेल्वेचे वेळापत्रकही बदलणार आहे. गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांतही बदल होणार आहे.

Advertisement

सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारे कोणते बदल येत्या १ नोव्हेंबरपासून होणार आहेत, याबाबत जाणून घेऊ या…

बॅंका अतिरिक्त शुल्क आकारणार
पुढील महिन्यापासून मर्यादेपेक्षा जास्त बँकिंग केल्यास, बॅंका वेगळे शुल्क आकारणार आहेत. कर्ज खात्यासाठी 150 रुपये भरावे लागतील, त्यानंतर महिन्यातून तीन वेळा पैसे काढले जातील. बँक ऑफ बडोदा (BoB) ने याची सुरुवात केली आहे.

Advertisement

बचत खाते असणाऱ्या खातेदारांना तीन वेळा मोफत पैसे भरता येतील, मात्र चौथ्या वेळेस 40 रुपये द्यावे लागतील. जन धन खातेधारकांना यात काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, परंतु पैसे काढल्यावर 100 रुपये द्यावे लागणार आहेत.

गॅसच्या किंमतीत वाढ? ओटीपी द्यावा लागणार
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल होऊ शकतो. गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. एलपीजी विक्रीतील तोटा पाहता, सरकार सिलिंडरच्या किमती वाढवू शकते.

गॅस सिलिंडर वितरणाची प्रक्रिया बदलणार आहे. गॅस बुकिंगनंतर ग्राहकांच्या मोबाईलवर ओटीपी येईल. सिलेंडर घेताना हा ओटीपी डिलिव्हरी बॉयला सांगावा लागेल. ओटीपी सिस्टीमशी जुळल्यानंतरच सिलिंडर दिला जाईल.

Advertisement

रेल्वेचे वेळापत्रक बदलणार
भारतीय रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. १ ऑक्टोबरलाच हे वेळापत्रक बदलणार होते. मात्र, काही कारणांमुळे ते लांबणीवर गेले होते. १ नोव्हेंबरपासून आता ते बदलणार आहे. देशातील 13 हजार प्रवासी रेल्वे आणि 7 हजार मालवाहू गाड्यांच्या वेळेत बदल होणार आहे.

अमेरिका प्रवासाच्या नियमांत बदल
जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी मंजूर केलेली लस घेतलेली असेल, तरच तेच नागरिक अमेरिकेला जाणाऱ्या विमानात चढू शकतील. लसीकरण झालेले नसल्यास अमेरिका वारी विसरा..

बँकांना सुट्ट्या
नोव्हेंबरमध्ये दिवाळीसह विविध सण-उत्सव आल्याने बँकाना जवळपास 17 दिवस सुटी राहणार आहे. त्यामुळे बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे सुट्ट्यांची यादी पाहूनच करावीत.

Advertisement

…तर व्हॉटस अॅप बंद होणार

फेसबुकच्या मालकीचे प्लॅटफॉर्म Android 4.0.3 Ice Cream Sandwich, iOS 9 आणि KaiOS 2.5.0 ला सपोर्ट करणार नाही. ज्या स्मार्टफोनवर ते सपोर्ट करणार नाहीत, त्यावर व्हाॅटस अॅप बंद होणार आहे. त्यात सॅमसंग, झेडटीई (ZTE), हुवाई (Huawei), सोनी (Sony), अल्काटेल (Alcatel) स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

एसबीआयकडून विशेष सुविधा

देशातील पेन्शनधारक त्यांचे जीवन प्रमाणपत्र घरबसल्या व्हिडिओ कॉलद्वारेही सादर करू शकतात. पेन्शनधारक जिवंत असल्याचा पुरावा म्हणजे जीवन प्रमाणपत्र.. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) येत्या 1 नोव्हेंबरपासून ही महत्वाची सुविधा सुरू केली आहे.

Advertisement

 

Advertisement