महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीत तब्बल 40 जागांसाठी भरती होत आहे. सातारा विभागासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीत अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) या पदांसाठी ही भरती होत आहे. त्यासाठीची पात्रता, निवड पद्धती, अर्ज कुठे करायचा, याबाबतची माहिती जाणून घेऊ या..
पुढील पदांसाठी भरती
अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन)- एकूण जागा 40
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
इच्छुक उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पूर्ण केलेले असावे. दहावी गुणपत्रिकेवरील व आधारकार्डवरील नाव सुसंगत असावं. ऑनलाईन अर्ज करताना 10 वी, आयटीआय (सर्व सेमिस्टर्स) मार्कशीट्स अपलोड करणं बंधनकारक आहे.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना, सर्व माहिती योग्यरित्या भरावी. अर्ज करताना मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी देणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
दहावीची गुणपत्रिका, आयटीआय सर्व सेमिस्टर्सच्या गुणपत्रिका, ओळखपत्र, आधारकार्ड, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, दोन पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर 2021
इथे करा अर्ज– https://www.apprenticeshipindia.gov.in/
सविस्तर माहितीसाठी – https://www.mahatransco.in/uploads/career/career_marathi_1635397734.pdf