SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावी-बारावी उमेदवारांसाठी महाराष्ट्र पोस्ट विभागात नोकरीची संधी, असा करा अर्ज..!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दहावी-बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी महाराष्ट्र टपाल विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

महाराष्ट्र टपाल विभागा अंतर्गत पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ अशा तब्बल 257 पदांसाठी ही भरती होणार आहे. उमेदवारांना त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या नोकरभरतीबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

पदनिहाय रिक्त जागा

  1. पोस्टल असिस्टंट – 93
  2. सॉर्टिंग असिस्टंट – 09
  3. पोस्टमन – 113
  4. मल्टी टास्किंग स्टाफ – 42

शैक्षणिक पात्रता
पद क्रमांक 1 ते 3 साठी उमेदवार 12 वी उत्तीर्ण असावा, मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र
पद क्रमांक 5 साठी उमेदवार 10 वी उत्तीर्ण, मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र.

Advertisement

क्रीडा पात्रता
– राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
– आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू.
– अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ / शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू
– नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, असे उमेदवार.

वयाची अट : 27 नोव्हेंबर 2021 रोजी
पद क्रमांक 1 ते 3 : 18 ते 27 वर्षे
पद क्रमांक 4 : 18 ते 25 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

Advertisement

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

Fee: General/OBC: ₹200/- (SC/ST/महिला/ट्रान्सजेंडर महिला : फी नाही)

Advertisement

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 नोव्हेंबर 2021

ऑनलाईन अर्ज करा
https://dopsportsrecruitment.in/

Advertisement

जाहिरात पाहा
https://drive.google.com/file/d/1zh7Y_EvfOuhx4UelW-fX87yn5n1LWAz2/view

Advertisement