SpreadIt News | Digital Newspaper

जिओचा स्वस्तात मस्त स्मार्टफोन फक्त 1999 रुपयांत मिळणार, बुकिंग कशी करायची? जाणून घ्या..

रिलायन्स जिओने (Reliance Jio) काही दिवसांपूर्वी घोषणा केलेला जिओ आणि गूगल या दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे डिझाइन केलेले बहुप्रतिक्षित जिओफोन नेक्स्ट (JioPhone Next) दिवाळीपासून स्टोअरमध्ये उपलब्ध होईल.

जिओफोन नेक्स्टची किंमत किती असणार?

Advertisement

रिलायन्स जिओने चार विविध प्रकारच्या फोन्सची घोषणा केली आहे. हे चारही फोन EMI च्या माध्यमातून खरेदी करण्यात येऊ शकतात.

पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या या स्मार्टफोनची बुकिंग रक्कम फक्त 1,999 रुपये असणार आहे. म्हणून JioPhone Next तुम्हाला 1,999 रुपयांच्या डाऊनपेमेंटसह खरेदी करता येऊ शकतो. ही बुकिंग केल्यावर उरलेली रक्कम तुम्ही 18 ते 24 महिन्यांच्या सुलभ हप्त्यांमध्ये भरू शकता. दिवाळीच्या आसपास हा स्मार्टफोन उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

Advertisement

जिओफोन नेक्स्ट बुक करण्यासाठी तुम्ही जिओमार्ट डिजिटल रिटेलर, जिओ वेबसाइटवरून अधिक माहीती घेऊ शकता किंवा 7018270182 या नंबरवर ‘HI’ असा मेसेज पाठवून माहीती घ्या. विशेष म्हणजे एन्ट्री-लेव्हल स्मार्टफोन (Jio Smartphone) असूनही यात लेटेस्ट फीचर्स आहेत.

वेबसाईटवर पाहा अधिक माहिती, आकर्षक फीचर्स आणि अपडेट्स 👉 https://www.jio.com/next

Advertisement

ग्राहकांसाठी जिओफोन नेक्स्टचे 4 स्मार्टफोन्स आणि प्लॅन्स:

👉 JioPhone Next: पहिला प्लान ‘ऑलवेज ऑन प्लॅन’ आहे, या प्लॅनमध्ये ग्राहकाला 18 महिन्यांसाठी 350 रुपये आणि 24 महिन्यांसाठी 300 रुपये द्यावे लागतील. या प्लॅनमध्ये ग्राहकाला दर महिन्याला 5 GB डेटा आणि 100 मिनिटे व्हॉइस कॉलिंग मिळेल.

Advertisement

👉 JioPhone Next Large: ही दुसरी योजना मोठी योजना आहे, ज्यामध्ये 18 महिन्यांचा हप्ता घेण्यासाठी प्रति महिना 500 रुपये आणि 24 महिन्यांचा हप्ता घेण्यासाठी 450 रुपये द्यावे लागतील. या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा तसेच अमर्यादित व्हॉइस कॉलिंग मिळेल.

👉 JioPhone Next XL: हा तिसरा प्लॅन XL प्लॅन आहे, हा 2 GB प्रतिदिन प्लॅन आहे ज्यामध्ये 18 महिन्यांच्या हप्त्यासाठी रुपये 550 आणि 24 महिन्यांच्या हप्त्यासाठी रुपये 500 प्रति महिना आहे.

Advertisement

👉 JioPhone XXL: ही योजना त्यांच्यासाठी आहे जे भरपूर डेटा वापरतात. या प्लानमध्ये 2.5 GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळेल. यामध्ये 18 महिन्यांसाठी 600 रुपये आणि 24 महिन्यांसाठी 550 रुपये हप्ता भरावा लागेल
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement