SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

यंदा कर्तव्य आहे? तुळशीच्या लग्नानंतर ‘या’ तारखेपासून विवाहासाठी शुभमुहूर्त होणार सुरू!

दिवाळीनंतर लग्नाचा हंगाम सुरु होतो. कोणी कोणी लगेचच दिवाळीनंतरच्या मुहूर्ताची वाट बघतात. यंदा कर्तव्याचे मुहुर्त 9 जुलैपर्यंत आहेत. दरवर्षी तुळशी विवाह होताच लगीनघाईला सुरुवात होते. 15 ते 19 नोव्हेंबर दरम्यान तुलसीविवाह होताच लग्नसमांरभाला सुरुवात होईल. यंदा 20 नोव्हेंबरपासून मुहुर्ताचा सुरू होणारा प्रवास जुलै 2022 पर्यंत चालणार आहे.

तसं पाहिलं तर 9 महिने विवाह सोहळ्याकरिता मिळणार आहेत. कोरोना संकटही म्हणूनच लग्नाचा बार उडवायला अनेक वधू व वरपक्ष सज्ज झाले असून नातेवाईकांकडून सोयरीक जुळवण्यावर भर दिला जात आहे. दरवर्षी तुळशीविवाहनंतर विवाह समारभाला धूमधडाक्‍यात सुरुवात होते.

Advertisement

यंदा कर्तव्य असलेल्यांना मुहुर्तानुसार नोव्हेंबर महिन्यापासून लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे. नोव्हेंबरमध्ये ज्यांनी विवाह निश्‍चित केले आहेत. त्यांच्याकडे पत्रिका छपाई बाजंत्री मंडप आचारी बस्त्याची तयारी सुरू आहे. यंदा नोव्हेंबरपासून लग्न सराईचा धूमधडाका सुरू होत (कोरोनाविषयक नियम पाळून) असून 20 नोव्हेंबर 2021 ते 9 जुलै 2022 पर्यंत लग्नतिथी आहेत.

जाणून घ्या विवाहाचे शुभ मुहूर्त:

Advertisement

आताच्या चालू वर्षी 2021 मध्ये नोव्हेंबर महिन्यात 20, 21, 29 आणि 30 तारखाच लग्नासाठी शुभ मुहूर्ताच्या असणार आहेत. तर डिसेंबर महिन्यात 8 शुभ मुहूर्त असून ते 1, 7, 8, 9, 13, 19,24, 26,27, 28, 29 तारखेला लग्नासाठी उत्तम मुहूर्त आहेत.

पुढील वर्षी:

Advertisement

▪️ जानेवारी – 20, 22, 23, 27, 29
▪️ फेब्रुवारी – 5, 6, 7, 10, 17, 19
▪️ मार्च – 25, 26, 27, 28
▪️ एप्रिल – 15, 17, 19, 21, 24, 25
▪️ मे – 4, 10, 13, 14, 18, 20, 21, 22, 25, 26, 27
▪️ जून – 1, 6, 8, 11, 13, 14, 15, 16, 18, 22
▪️ जुलै – 3, 5, 6, 7, 8, 9

गेल्या काही काळात कोरोना संकटामुळे सर्वांचेच मोठे नुकसान झाले आहे. ज्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय हंगामी आहे, त्यांना खूप आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे. त्यासोबतच अनेक लग्न पुढेही ढकलली असल्याचं आपण आपल्याच गावात, शहरात पाहिलं असेलच! आता नवीन जोमाने यंदा लगीनसराई लग्नमंडप, हॉटेल्स ते बँड, ढोल, केटरर्स, मिठाईवाले, कामगार यांना समाधानी ठेवेल का, हे बघणे गरजेचे आहे. तसेच, वेगवेगळ्या पंचांगनुसार हे मुहूर्त कमी अधिक होत असल्याने अनेकजण आतापासूनच तयारीला लागले असल्याचे चित्र आहे.

Advertisement

(हा लेख उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित, तरी आपण ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करूनच आपला शुभमुहूर्त खात्रीपूर्वक ठरवून घ्या.)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement