SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021

मेष (Aries) : आपल्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीला गैरसमज वाटणार नाही याची काळजी घ्या. आरोग्य साथ देईल. प्रत्येक वेळी सामंजस्याने कृती करा.

Advertisement

वृषभ (Taurus) : एक घाव दोन तुकडे करण्याची सवय बदला. भौतिक व चैनीच्या गोष्टींसाठीचा खर्च कमी केल्यास आर्थिक बचतीत वाढ होईल.

मिथुन (Gemini) : नोकरदारवर्गाला कामकाजात बदल करावे लागतील. राजकीय क्षेत्रात स्वत:हून पुढाकार घेऊन संकल्प करून कामाची सुरुवात कराल.

Advertisement

कर्क (Cancer): वरिष्ठांच्या मर्जीशिवाय कोणतीही हालचाल करणे टाळा. इतरांच्या वैयक्तिक कर्जासाठी मध्यस्थी न केलेली चांगली.

सिंह (Leo) : व्यवसाय वाढीसाठी केलेल्या जाहिरात माध्यमांचा उपयोग होईल. कुटुंबातील सर्व जण एकत्रित येऊन एखाद्या कार्यक्रमासंदर्भात चर्चा कराल.

Advertisement

कन्या (Virgo): ग्राहकांशी संपर्क वाढेल. आवक उत्तम राहील. आनंद आणि संतोषाची भावना राहील. व्यापार- धंद्यासंबंधी प्रवास होईल आणि त्यात लाभ होईल.

तूळ (Libra) : नात्यातील सलोखा वाढेल. कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर करा. आज आप्त, इष्ट आणि मित्र आपणाला घेरून टाकतील.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : जोडीदाराला विश्वासात घेऊन पुढील गोष्टींचे आयोजन करा. व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. मित्र आपल्या प्रगतीत मदत करतील.

धनु (Sagittarius) : द्विधा अवस्था टाळा. नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. खर्च अधिक झाल्याने आर्थिक चणचण भासेल.

Advertisement

मकर (Capricorn) : योग्य समतोल राखा. कुटुंबातील व्यक्ती आणि ऑफिसातील सहकारी यांच्याशी मतभेद किंवा वादविवादाचे प्रसंग येतील.

कुंभ (Aquarius) : सार्वजनिक गोष्टींची आवड निर्माण होईल. मौजमस्ती आणि मनोरंजनात वेळ खर्च होईल. विशेषतः संतती आणि तब्बेती विषयक जास्त चिंता वाटेल.

Advertisement

मीन (Pisces) : पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील. आज आपण एखाद्या नव्या कामाचे नियोजन किंवा सुरुवातही करू शकाल

Advertisement