SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खुशखबर! शेतकऱ्यांनो ट्रॅक्टर खरेदीवर 50 टक्के अनुदान मिळणार, योजनेविषयी जाणून घ्या..

शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढवून शेती व्यवसयात प्रगती व्हावी याकरिता सरकार वेगवेगळ्या योजना (agricultural scheme) राबवत आहे. यांत्रिकीकरण यामधील प्रमुख घटक झाला आहे. बैलजोडीला कामाला वेळ लागतो म्हणून शेतकऱ्यांचाही यांत्रिकीकरणावर भर आहे. प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेद्वारे ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान दिले जाते.

पैशांअभावी अनेक शेतकरी (Farmer) ट्रॅक्टर खरेदी (Tractor Subsidy Scheme) करु शकत नाहीत. म्हणून सरकारची शेतकऱ्यांना निम्म्या म्हणजेच 50 टक्के अनुदानावर किमतीमध्ये ट्रॅक्टर मिळवून देण्यासाठी योजना सुरु आहे.

Advertisement

सरकारच्या योजनेबद्दल जाणून घ्या…

शेतकऱ्याने सरकारच्या योजनेतून ट्रॅक्टरची खरेदी केली तरच अनुदानाचा लाभ होणार आहे. यातील अनुदानाचा काही हिस्सा राज्य सरकार तर काही केंद्र सरकार अनुदानरुपी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करतात. त्यामुळे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यावरील आर्थिक भार कमी होतो. या शिवाय काही राज्य सरकार ही 20 ते 50 टक्के सबसिडीवरही ट्रॅक्टर (20% to 50% Subsidy On Tractor) उपलब्ध करुन देत आहेत.

Advertisement

कसा घ्याल योजनेचा लाभ?

तुम्हाला जर ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल, तर प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजना ही कृषी विभागाकडून राबवली जात आहे. या योजनेतून अर्ज करण्याचे अधिकार हे सीएससी केंद्राना (CSC) देण्यात आलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना सीएससी केंद्रावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. तिथे आधार कार्ड, जमिनीचा सात-बारा (7/12) उतारा, 8-अ आणि तुमच्या बॅंक अकाऊंटचे पासबूक, पासपोर्ट साईज असलेले फोटो हे तुमच्याजवळ ठेवावे लागणार आहेत. जर आपल्याला काही समस्या आल्यास कृषी साहाय्यक यांच्याशी संपर्क करावा लागणार आहे.

Advertisement

अधिक माहीतीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता 👉https://mahadbtmahait.gov.in/Farmer/SchemeData/SchemeData?str=E9DDFA703C38E51A147B39AD4D6A9082

या योजनेस पात्र होण्यासाठी अटी:

Advertisement

▪️ मागील सात वर्षामध्ये सदर शेतकऱ्याने ट्रॅक्टर खरेदी केलेले नसावे.

▪️ शेतकऱ्याकडे स्व-मालकीची जमीन असणं आवश्यक
▪️ शेतकऱ्याला फक्त एक ट्रॅक्टरसाठी अनुदान प्राप्त होईल.
▪️ प्रत्येक घरातील एकच व्यक्ती अनुदानासाठी पात्र राहील.
▪️ ही योजना केवळ सीमांत शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीच आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement