SpreadIt News | Digital Newspaper

फेसबूकने बदलले आपले नाव, लोगोतही केला मोठा बदल, युजर्सवर काय परिणाम होणार..?

गेल्या काही दिवसांपासून ‘फेसबुक’ नवीन नावाने रिब्रँड करण्याचा विचारात असल्याचे समोर येत होते. अखेर ‘फेसबुक’ने आपल्या कंपनीचं नाव बदललं आहे. ‘मेटा’ असे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नाव असणार आहे. अर्थात ‘फेसबुक’च्या मालकीच्या स्वतंत्र प्लॅटफॉर्मची नावे मात्र कायम राहणार आहेत..

‘फेसबुक’ कंपनीचा संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी यासंदर्भात घोषणा केली. फेसबूक आता ‘मेटाव्हर्स’ कंपनी असेल. ‘मेटाव्हर्स’ म्हणजे ‘व्हर्चूअल’ विश्वाला अधिक प्राधान्य…! इंटरनेटवर लोक जेव्हा ‘व्हर्चूअल’ विश्वात भ्रमंती करतात, तेव्हा त्याला ‘मेटाव्हर्स’ म्हणतात.

Advertisement

झुकरबर्ग म्हणाले, की ‘मेटाव्हर्स पद्धतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलत आहोत. ‘मेटा’ कंपनी आता ‘एम्बेडेड इंटरनेट’वर, जे वास्तविक आणि आभासी जग एकत्र आणण्याचे काम करील.

Advertisement

‘मेटाव्हर्स’ हे एक पूर्णतः ऑनलाईन विश्व असेल, ज्यात व्हर्च्युअल वातावरणात आपल्याला ऑनलाईन गेम्स खेळता येतील, कामे करता येतील, तसेच एकमेकांशी संवादही साधता येणार असल्याचे झुकरबर्ग म्हणाले.

युजर्सवर काय परिणाम होणार..?
‘फेसबुक’ या ब्रॅण्डखाली या कंपनीच्या अनेक उपकंपन्या आहेत. त्यात ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘व्हॉट्स अ‍ॅप’, ‘ऑक्युलस’ आणि इतर काही कंपन्यांचा समावेश आहे. फेसबूकचे नामकरण बदलताना सध्याच्या सेवा व अ‍ॅपची नावे बदलली जाणार नाहीत. या अ‍ॅपच्या युजर्सवर कोणताही परिणाम होणार नाही.

Advertisement

लोगोतही केला बदल
फेसबूकने केवळ आपले नावच नाही, तर ‘लोगो’ही बदलला आहे. आता फेसबुकच्या ‘एफ’ऐवजी ‘इन्फीन्टी’चे चिन्ह लोगो असणार आहे. त्यातून फेसबुकने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अमर्याद शक्यता आणि त्यावरील संशोधन याच ब्रॅण्डखाली केले जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.

2005 मध्ये बदलले होते नाव
‘फेसबुक’चे माजी सिविक इंटिग्रिटी चीफ समिध चक्रवर्ती यांनी ‘मेटा’ हे नाव सुचविले. यापूर्वी फेसबूकने 2005 मध्ये आपले नाव बदलले होते. ‘द फेसबूक’ (TheFacebook) ऐवजी ‘फेसबूक’ (Facebook) असे केले होते.

Advertisement

जगभरात 3 अब्जांहून अधिक लोक फेसबुक वापरतात. भारतात फेसबुक वापरकर्त्यांची संख्या 41 कोटी आहे. ऑनलाइन सुरक्षिततेबाबत अनेक देशांमध्ये या कंपनीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. नाव बदलल्यानंतर फेसबूक आता कसे काम करते, याकडे लक्ष लागले आहे.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement