SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आर्यन खानची आजची रात्रही तुरुंगातच.., ‘या’ कारणांमुळे जामीन होऊ शकतो रद्द!

मुंबई क्रुझ ड्रग्ज केस प्रकरणात आर्यन खानच्या जामीन अर्जावर सही करण्यासाठी जामीनदार म्हणून जुही चावलाने भूमिका बजावली आहे. आज आर्यनचा जामीन आदेश (Aryan Khan’s bail release order) स्वीकारण्याची वेळ संपल्याने आर्यन खानची आज देखील आर्थर रोड तुरुंगामधून सुटका झाली नाही. त्यामुळे आजची रात्र देखील आर्यनला तुरुंगामध्ये घालवावी लागणार आहे.

उद्या सकाळी आर्यन तुरुंगातून बाहेर येणार?

Advertisement

जामीनासाठी लागणारे कागदपत्रे वेळेत पोहोचले नसल्याने आज आर्यनची सुटका (Aryan Khan will not be released from the jail today) होणार नाही. आज (ता.29) संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आर्यनच्या जामीनाचं पत्र आर्थर रोड जेलच्या टपाल पेटीत पडणं अपेक्षित होतं. परंतु, टपाल पेटीत त्या वेळेत पत्र न आल्याने, त्यामुळे आज आर्यनची सुटका होणार नाही. ऑर्थर रोड जेल प्रशासनाने (Arthur Road Jail officials) याबाबतची माहिती दिली आहे.

आर्यनला आजची रात्रदेखील जेलमध्ये काढावी लागणार असून आता आर्यनची सुटका ही उद्या होणार आहे, आर्थर रोड तुरुंग प्रशासनाने सर्वांना नियम समान असून कुणासाठीही वेळेत बदल होणार नाही. सुटकेसाठी आर्थर रोड कारागृहाबाहेरील जामीन पेटीत रिलीझ ऑर्डरची प्रत प्रत्यक्ष निर्धारित वेळेत पडणे आवश्यक असते. त्यासाठी तुरुंग अधिकारी साडेपाच वाजेपर्यंत वाट पाहतात, अशी माहिती देखील आर्थर रोड तुरुंग अधीक्षक नितीन वायचल (Nitin Waychal, Arthur Road Jail Superintendent) यांनी दिली आहे.

Advertisement

मुंबई हायकोर्टाच्या निकालाच्या प्रमाणित प्रतीवर एनडीपीएस कोर्ट सुटकेचे आदेश जारी करते. हायकोर्टाच्या आदेशानुसार कैद्याच्या सुटकेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर हे आदेश जारी केले जातात. आर्यन खानला गुरुवारी (ता.28) जामीन मंजूर करण्यात आला होता पण न्यायालयाची प्रत पोहोचली नसल्याने त्याला एक रात्र तुरुंगातच काढावी लागली होती. अखेर आज न्यायालयाने जामीन आदेशाची प्रत जारी केली. मुंबई उच्च न्यायालयाने 5 पानी जामीन आदेश जारी केला आहे. आर्यनला जामीन देताना काही अटींचे पालन करावे लागेल, असे म्हटले आहे. त्याला ठरवून दिलेल्या वेळेत एनसीबी कार्यालयात हजेरीही लावावी लागणार आहे.

‘या’ अटींचे पालन नाही केले तर आर्यनचा जामीन होणार रद्द!

Advertisement

▪️ आर्यन या प्रकरणातील अन्य कोणत्याही आरोपीशी संपर्क साधणार नाही.
▪️ पुराव्याशी छेडछाड करणार नाही.
▪️ पासपोर्ट स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये जमा करावा लागणार.
▪️ प्रसारमाध्यमांमध्ये भाषण करावे लागणार नाही.
▪️ न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडणार नाही.
▪️ एनसीबीला गरज पडेल तेव्हा सहकार्य करावे लागेल.
▪️ अटी मान्य करूनही उल्लंघन केल्यास जामीन रद्द करण्यात येईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement