SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता 7/12 काढा मोबाईलवरून घरच्या घरी, कसा? वाचा सविस्तर..

राज्यातील शेतकऱ्यांना सातबारा उतारा अनेक सरकारी आणि महत्त्वाच्या कामांसाठी आवश्यक असतो. मात्र सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयात उगाचच फेऱ्या घालाव्या लागतात. मात्र तुम्हाला आता कोणत्याही कटकटीशिवाय सातबारा सोप्या पद्धतीने मिळू शकतो.

राज्य सरकारने सात बारा ऑनलाईन केला आहे. काही दिवसांपासून 7/12 नव्या फॉरमॅटमध्ये मिळत आहे. 2008 पासूनचे फेरफार सुद्धा डिजीटल रुपात मिळतील. यामुळे तलाठ्याचा वेळ वाचणार आहे”, अशी माहीती याआधीच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेली आहे.

Advertisement

सातबारा घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीने कसा काढणार?

तुमचा डिजीटल सातबारा काढण्यासाठी तुम्हाला bhulekh.mahabhumi.gov.in महाराष्ट्र राज्य सरकारच्या वेबसाईटवर जावं लागेल.

Advertisement

सदर वेबसाईट ओपन केल्यानंतर सर्वात वर digitally signed 7/12 आणि मराठीत ‘डिजीटल स्वाक्षरीतला सातबारा पाहण्यासाठी इथं क्लिक करा’ हा पर्याय दिसेल.

त्या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला लाॉगिन करावं लागणार आहे किंवा मोबाईल नंबर टाकूनही तुम्हाला लॉगिन करता येईल. त्यासाठी OTP BASED LOGIN वर क्लिक करा आणि तुमचा चालू मोबाईल नंबर टाका

Advertisement

तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी (OTP-एक क्रमांक) तिथे टाकल्यानंतर Verify OTP वर क्लिक करा. मग नवीन पेज ओपन होईल. त्या पेजवर अनेक पर्याय दिलेले असतील.

त्यानंतर ‘डिजीटल स्वाक्षरीत 7/12’ हे पेज ओपन होईल. मग तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, गाव, सर्व्हे नंबर अशी माहीती भरावी लागेल.

Advertisement

यानंतर सर्वात खाली तुम्हाला सातबाऱ्यासाठी 15 रुपये भरण्याची सूचना दिली असेल. भीम ॲप (BHIM App, क्रेडीट (Credit Card) किंवा एटीएम मधून पैसे काढण्यासाठी वापरण्यात येणारे डेबिट कार्ड (Debit Card) आणि इंटरनेट बँकींगच्या (Netbanking) साहाय्याने पैसे भरता येतील.

पैसे भरल्यानंतर फॉर्मच्या पेजवर माघारी येवून आपली सर्व माहिती भरायची आहे. माहिती भरून झाल्यावर तुम्हाला डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करायचं आहे. डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये तुमचा डिजीटल सातबारा डाऊनलोड होऊन मिळणार आहे.

Advertisement

तुम्ही काढलेल्या ऑनलाईन सातबारा (Digital 7/12) मध्ये चूक असल्यास…

जर आपण पाहिलेल्या ऑनलाईन 7 /12 मधील माहितीमध्ये व हस्तलिखित 7/12 मधील माहिती मध्ये , जसे 7/12 चे एकूण क्षेत्र, क्षेत्राचे एकक, खातेदाराचे नाव, खातेदाराचे क्षेत्र या मध्ये चूक अथवा तफावत आढळून आल्यास आपण अशा दुरुस्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने तलाठी यांचेकडे ई हक्क प्रणाली द्वारे अर्ज पाठवू शकता.

Advertisement

त्यासाठी कृपया https://pdeigr.maharashtra.gov.in ही लिंक वापरून Mutation 7/12 या पर्यायामध्ये दर्शवलेल्या माहितीनुसार आपले रजिस्ट्रेशन व लॉगीन करून जुना हस्तलिखित 7/12 ऑनलाईन अर्जासोबत अपलोड (Upload- तिथे असलेल्या या पर्यायावर क्लिक करून जुना हस्तलिखित 7/12 फाईल टाकावी) करावा .
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement