SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग: आता नगरसेवकांची संख्या वाढणार, प्रभाग रचना बदलणार? वाचा शासन निर्णय..

महाराष्ट्रातील वेगाने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचाही वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय काल (ता.27) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान 65 सदस्य व कमाल 175 इतकी आहे. तर नगरपरिषदांमधील सदस्य संख्या किमान 17 सदस्य व कमाल 65 इतकी आहे. मंत्रिमंडळाने 17 टक्के नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने प्रभाग वाढणार असल्याने सध्याची प्रभाग रचना बदलते की काय, अशी भीती व्यक्त होतेय.

शासनाच्या निर्णयात काय म्हटलंय?

Advertisement

▪️ महानगरपालिकांमध्ये 3 लाखापेक्षा अधिक व 6 लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 76 व अधिकतम संख्या 96 पेक्षा जास्त नसेल.

▪️ 6 लाखापेक्षा अधिक व 12 लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 96 व अधिकतम संख्या 126 पेक्षा जास्त नसेल.

Advertisement

▪️ 12 लाखापेक्षा अधिक व 14 लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 126 व अधिकतम संख्या 156 पेक्षा जास्त नसेल.

▪️ 24 लाखापेक्षा अधिक व 30 लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 156 व अधिकतम संख्या 168 पेक्षा जास्त नसेल.

Advertisement

▪️ 30 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 168 व अधिकतम संख्या 185 पेक्षा जास्त नसेल.

👉 अ वर्ग नगरपरिषदांमधील निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या 40 व अधिक संख्या 75 हून जास्त नसेल.

Advertisement

👉 ब वर्ग नगरपरिषदांमधील निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या 25 व अधिक संख्या 37 हून जास्त नसेल.

👉 क वर्ग नगरपरिषदांमधील निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या 20 व अधिक संख्या 25 हून जास्त नसेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement