SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फेसबूकवरील मैत्रीला भुलली.. उच्चशिक्षित तरुणीला सायबर चोराचा दोनदा गंडा.., नेमकं काय घडलं, वाचा..

सध्या ऑनलाईन बॅंकिंगचे प्रमाण वाढले आहे. मोबाईल वाॅलेटच्या माध्यमातूनच अगदी छोटे-मोठे व्यवहार केले जातात. सरकारही ऑनलाईन बॅंकिंगसाठी प्रोत्साहन देत आहे. मात्र, दक्षता न घेतल्याने सायबर गुन्हेगारीचे प्रकारही वाढले आहेत.

काही दिवसांपूर्वी नागपुरातून सायबर चोरांनी वृद्धांना जास्त टार्गेट केल्याचे समोर आले होते. वृद्धांना मोठ्या प्रमाणात गंडा घातला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर सायबर पोलिसांनी कारवाईचा आसूड उगारला होता.

Advertisement

ऑनलाईन व्यवहाराबाबत पोलिसांकडून वारंवार सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत असला, तरी महाराष्ट्रात अशा घटना सतत समोर येत आहेत. विशेष म्हणजे, उच्चशिक्षित तरुण-तरुणीही सायबर चोरीला बळी पडल्या आहेत. असाच एक प्रकार पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आलाय..

नेमकं प्रकरण काय?
पिंपरी चिंचवडमधील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणीला सायबर चोरांनी चक्क दोन वेळा गंडा घातला. एकदा फसवणूक झाल्यानंतरही त्यातून बोध न घेतल्याने या तरुणीला लाखो रुपयांना लुटण्यात आले. ही तरुणी परत परत सायबर चोरांच्या जाळ्यात अडकत फसत गेली.

Advertisement

पहिली फसवणूक
उच्चशिक्षित तरुणीची फेसबूकवर एकसोबत मैत्रीद्वारे झाली. घट्ट मैत्री झाल्यावर सायबर चोराने या तरुणीला एक महागडे गिफ्ट पाठवले असल्याचे सांगितले. ते गिफ्ट घेण्यासाठी कस्टममध्ये पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर स्वतः आलोय.. पोलिसांनी पकडलंय.. असं सांगून पैसे पाठविण्यास सांगितले.

उच्चशिक्षित तरुणीने या सायबर चोराच्या खात्यावर तब्बल 9 लाख रुपये पाठविले, अखेर तिला आपल्याला गंडविण्यात आल्याची जाणीव झाली. मात्र, त्यानंतरही तरुणी सावध झाली नाही.

Advertisement

दुसरी फसवणूक
एकदा गंडा घातल्यावरही ही पीडित तरुणी सावध झाली नाही. कर्ज देण्याच्या नावाखाली या तरुणीला दुसऱ्या एका सायबर गुन्हेगाराने पुन्हा एकदा फसविलं. कधी प्रोसेसिंग फी, तर कधी डोक्युमेंन्टशन फीच्या नावाखाली टप्प्याटप्प्याने या आरोपीने या तरुणीकडून लाखो रुपये उकळल्याचे समोर आलेय.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement