SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोव्हेंबरमध्ये 17 दिवस देशातील बॅंकांना सुटी, महाराष्ट्रात किती दिवस बॅंका राहणार बंद, जाणून घेण्यासाठी वाचा..

नोव्हेंबर महिन्यात दिवाळीसह मोठ्या प्रमाणात सण-उत्सवाची रेलचेल राहणार आहे. त्यामुळे अनेक विभागांना सुटी असणार आहे. त्यात भारतीय रिझर्व्ह बँकेनेही (RBI) बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केलीय. त्यानुसार नागरिकांना कामे करावी लागणार आहेत.

‘आरबीआय’ दर महिन्याला सुट्ट्यांची यादी जाहीर करीत असते. नोव्हेंबरमध्ये धनत्रयोदशी, दिवाळी, पाडवा, भाऊबीज, गुरु नानक जयंती असे मोठे सण-उत्सव आले आहेत. त्यानुसार, एकूण 17 दिवस देशभरातील बँकांना सुटी असणार आहे.

Advertisement

काही राज्यांमध्ये तेथे साजरे होणारे सण, उत्सवावर अतिरिक्त सुट्ट्या अवलंबून असणार आहेत. कोणत्या राज्यात किती सुट्या असतील, महाराष्ट्रातील बॅंकांचे कामकाज किती दिवस चालणार आहे, चला तर मग जाणून घेऊ या..

महाराष्ट्रातील बँकांना सुटी
देशातील बँका नोव्हेंबरमध्ये १७ दिवस बंद राहणार आहेत. त्यात शनिवार-रविवारच्या सुट्यांचाही समावेश आहे. मात्र, महाराष्ट्रामध्ये केवळ नऊच दिवस बँका बंद राहणार आहेत. महाराष्ट्रात दिवाळीनिमित्त दोन दिवस, तसेच गुरू नानक जयंतीनिमित्त बँकांना सुटी असणार आहे.

Advertisement

‘आरबीआय’ने 1, 3, 4, 5, 6, 10, 11, 12, 19, 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी देशभरातील बॅंकांना सुटी जाहीर केलीय. 7, 14, 21 आणि 28 नोव्हेंबरला रविवारी देशभरात बँकांना सुट्टी असेल. त्याचबरोबर 13 नोव्हेंबरला दुसरा शनिवार आणि 27 नोव्हेंबरला चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत..

‘आरबीआय’ने जारी केलेल्या बँकेच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, खातेदारांनी बॅंकेतील कामांचा निपटारा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement