SpreadIt News | Digital Newspaper

‘त्या’ कमेंटमुळे पाकिस्तानचा वकार युनूस तोंडावर आपटला, जगभर टीका झाल्यावर म्हणे, ‘माफ करा..!’

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवारी (24 ऑक्टोबर) मॅच झाली. त्यात पाकिस्तान संघाने टीम इंडियाचा मोठा पराभव केला. मात्र, त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. पाकिस्तानकडून विजयाचा उन्माद सुरु झाल्याचे चित्र समोर येत आहे.

बाबर आझमच्या नेतृत्त्वाखाली पाक संघाने भारताचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानमध्ये जोरदार सेलिब्रेशन झाले. या विजयावर टीव्हीवर बोलताना पाकिस्तानचा माजी कॅप्टन, कोच वकार युनूसची (Waquar Younis) जीभ घसरली.

Advertisement

वकार युनूस याने भारत-पाक सामन्याचा संदर्भ थेट धर्माशी जोडल्याने जगभर खळबळ उडाली. अनेकांनी वकारच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. मोठ्या टीकेचा धनी झालेल्या वकारला अखेर आपला माफीनामा सादर करावा लागला.

नेमकं काय घडलं..?
भारतीय संघाविरुद्ध विजय मिळविल्यावर पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान याने मैदानातच नमाज अदा केली होती. रिझवानच्या या कृतीचे वकारने मोठं कौतुक केलं.

Advertisement

Advertisement

तो म्हणाला, की “भारताविरुद्ध विजय मिळवल्यावर रिझवाननं भर मैदानात नमाज अदा केली, हे मला त्याच्या खेळीपेक्षाही जास्त महत्त्वाचं वाटत. विशेषत: सर्व हिंदूंमध्ये उभं राहून त्यानं नमाज अदा केली..!” वकारच्या या वक्तव्यानंतर त्याच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड उठली.

‘त्या’ कमेंटमुळे पाकिस्तानचा वकार युनूस तोंडावर आपटला, जगभर टीका झाल्यावर म्हणे, ‘माफ करा..!’
भारतीय कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी म्हटलं, की ‘वकारच्या या वक्तव्यामुळे मी निराश झालो. आम्ही खेळाविषयी बोलतो. अशा वक्तव्यांमुळे क्रिकेट हा फक्त खेळ आहे, असं सांगणं आमच्यासारख्या क्रीडाप्रेमींना कठीण जातं..’

Advertisement

अखेर वकारला उपरती..
सर्वच स्तरातून टीका झाल्यावर अखेर वकारला उपरती झाली. त्यानंतर त्याने आपला माफीनामा सादर केला. तो म्हणाला, की ‘विजयाच्या उत्साहात भावनेच्या भरात माझ्याकडून ते वक्तव्य झालं.

माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता.. माझ्याकडून खरंच चूक झाली. लोकांमधील धार्मिक भेद, रंगभेद विसरण्याचं खेळ हे माध्यम आहे, जे सर्वांना जोडून ठेवते. मी सर्वांची माफी मागतो..’

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement