SpreadIt News | Digital Newspaper

तुमचा बंद पडलेला जिओ नंबर चालू करा फक्त 10 रुपयांत; नेमकं काय करावं लागणार?

भारतात आजमितीला असे कित्येक लोक आहेत की, ज्यांच्याकडे एक सिम कॉलिंग आणि एक इंटरनेट पॅक टाकून वापरण्यासाठी ठेवतात. अशा वेळेस दोन्ही सिमवर रिचार्ज टाकणं कधीकधी जमत नाही, तर कधी परवडत नाही. मग अशावेळी तुमचं सिम बंद पडतं. मग काय करायला हवं, असा प्रश्न पडतो.

मग तुम्हाला हे माहीत हवं की, आपल्याला शंभर-दोनशे रुपयांचे रिचार्ज करण्याची गरज नाहीये. होय! काही लोक फक्त त्यांचा नंबर चालू ठेवण्यासाठी त्यांचा फोन रिचार्ज (Jio Recharge) करतात, त्यांच्यासाठी ही युक्ती फायद्याची ठरणार आहे. फक्त नंबर चालू ठेवण्यासाठी जर तुम्हाला जिओचा रिचार्ज करायचा असेल, तर थोडक्यात जाणून घ्या..

Advertisement

Jio नंबर चालू ठेवण्यासाठी रिचार्ज कोणते?

10 रुपयांचा प्लॅन (10 Rs. Top-up Voucher): हा एक एक टॉप-अप प्लॅन (Jio Top-up Pack) आहे. यामध्ये यूजर्सला 7.47 रुपयांचा टॉकटाईम दिला जातो. या प्लॅनची वैधता अमर्यादित आहे. यामध्ये ग्राहकांना टॉकटाईम सोडून इतर काहीही फायदा मिळत नाही. रिचार्ज केल्यावर येणारा टॉकटाईम बॅलन्सचा वापर ग्राहकांना इंटरनेट वापरण्यासाठीही करता येऊ शकतो.

Advertisement

20 रुपयांचा प्लॅन (20 Rs. Top-up Voucher): 10 रुपयांच्या प्लॅननंतर 20 रुपयांचा एक टॉप-अप प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत 20 रुपये आहे आणि यामध्ये यूजर्सना 14.95 रुपयांचा टॉक-टाईम (Talktime) मिळतो. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड वैधता मिळते. यामध्ये इतर कोणताही लाभ दिला जात नसून यामध्ये उपलब्ध असलेला टॉकटाईम इंटरनेट (Internet Packs) सेवेसाठीही वापरला जातो.

50 रुपयांचा प्लॅन (50 Rs. Top-up Voucher): तुम्हाला जर जास्त टॉकटाईम हवा असेल, तर हा देखील टॉप-अप प्लॅनचा पर्याय आहे. यामध्ये यूजर्सना 50 रुपयांचा रिचार्ज करून 39.37 रुपयांचा टॉक-टाईम मिळतो. तसेच यात अनलिमिटेड वैधता उपलब्ध आहे. यामध्ये इतर कोणताही लाभ दिला जात नाही. या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेला टॉकटाइम इंटरनेट सेवेसाठीही (Jio Data Packs) वापरला जातो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement