SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अन्यथा तुमची पेन्शन येणं होईल बंद; लवकरात लवकर करा ‘हे’ काम!

तुम्हाला यापूर्वी पेन्शन येत असेल तर ती येणे बंद होऊ शकते. नियमानुसार, या वर्षी देशातील सर्व पेन्शनधारकांना 30 नोव्हेंबरपर्यंत आपले जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) म्हणजे हयातीचा दाखला जमा करावा लागेल. जर असे केले नाही तर त्यांची पेन्शन थांबवण्यात येईल.

देशातील सर्व निवृत्त कर्मचार्‍यांसाठी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिना अति महत्वाचा असतो. याच महिन्यांमध्ये पेन्शनधारकांना लाईफ सर्टिफिकेट (जीवन प्रमाणपत्र) जमा करावे लागते. लाईफ सर्टिफिकेट जमा केल्यावर पेन्शन मिळणं त्यापुढेही नियमानुसार सुरू राहते.

Advertisement

जीवन प्रमाणपत्र जमा करण्याच्या विविध पद्धती

▪️ तुम्ही जीवन प्रमाणपत्र पोर्टल https://jeevanpramaan.gov.in/ वर आपले लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता.

Advertisement

▪️ यासाठी अगोदर पोर्टलवरून जीवन प्रमाणपत्र ॲप डाऊनलोड करावे लागेल. याशिवाय UIDAI द्वारे मान्य फिंगरप्रिंट डिव्हाईस देखील असणं गरजेचं आहे.

▪️तुमच्या स्मार्टफोनद्वारे ईमेल आयडी (E-mail ID) आणि आणि अ‍ॅपमध्ये सांगण्यात आलेल्या पद्धतीनुसार जीवन प्रमाणपत्र घरबसल्या जमा करू शकता.

Advertisement

▪️ जीवन प्रमाणपत्र पारंपरिक पद्धतीने जमा केले जाऊ शकते, ज्यामध्ये पेन्शनधारकांना आपली पेन्शन घेण्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागते. पेन्शनधारक 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या डोअरस्टेप बँकिंग अलायन्स सेवेचा वापर करून डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.

▪️ डोअरस्टेप सेवेचा (घरबसल्या) वापर करण्यासाठी प्ले स्टोअर वरून ‘Doorstep Banking’ अ‍ॅप इंस्टॉल करा 👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.atyati.customer_dsb

Advertisement

अधिक माहितीसाठी आपण हेल्पलाईन नंबरवरही कॉल करू शकता 👉 18001037188

काय आहे डोअरस्टेप बँकिंग, जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट 👉 https://psbdsb.in/

Advertisement

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार..

ज्येष्ठ नागरिकांना आता हे सर्टिफिकेट जमा करण्यासाठी बँकेपर्यंत येण्याची आवश्यकता नाही. आता इंडिया पोस्‍ट पेमेंट्स बँकेचे (India Post Payments Bank) 1.89 लाख टपाल सेवक हे प्रमाणपत्र त्यांच्या घरून घेऊन बँक किंवा संबंधित विभागाकडे जमा करतील. केंद्र सरकारने आता 80 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ पेन्शनधारकांसाठी (Pensioners) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वरीलपैकी एक पद्धत वापरून आपण जीवन प्रमाणपत्र जमा करू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement