SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दिवाळीसाठी ठाकरे सरकारची नियमावली जाहीर, फटाके फोडणार असाल, तर सावधान, हे नियम वाचा..

रशिया, ब्रिटन आणि चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढला आहे. मध्यंतरी कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाल्याने काही राष्ट्रांनी कोविड निर्बंध हटविले होते. जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच, पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याचे दिसत आहे.

भारतातही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. सध्या कोरोना रुग्णसंख्येवर बऱ्यापैकी नियंत्रण आलेले आहे. लसीकरणही सुरु आहे. मात्र, तरी कोरोनाबाबत दक्ष राहावे लागणार आहे.

Advertisement

दिवाळीचा सण तोंडावर आलेला आहे. ठाकरे सरकारने सिनेमागृहे, नाट्यगृहांसह दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमांनाही परवानगी दिलीय. मात्र, कोरोना संकट कायम असल्याने दिवाळीसाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केलीय. याबाबत जाणून घेऊ या…

दिवाळीसाठीची नियमावली…
१. राज्यातील धार्मिक स्थळे खुली केलेली असली, तरीही दिवाळीचा उत्सव घरगुती मर्यादित स्वरुपात असावा.

Advertisement

2. दिवाळीत मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी होते. त्यातून वायू नि ध्वनीप्रदूषण वाढते. त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होताे. कोरोनाबाधित किंवा कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनाही फटाक्यांच्या धुराचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फटाके न फोडता, दिव्यांची आरास करावी.

3. दिवाळीनिमित्त बाजारपेठ गजबजलेली असते. मात्र, नागरिकांनी गर्दी टाळावी. विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी घराबाहेर पडणे टाळावे.

Advertisement

4. बाहेर पडताना मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना नियमांचे पालन करावे.

5. दिवाळी पहाटसारखे कार्यक्रम कोविड १९ संसर्ग प्रतिबंधात्मक नियमानुसारच होतील. शक्यतो असे कार्यक्रम ऑनलाईन, केबल नेटवर्क किंवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून करावेत.

Advertisement

६. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम / रक्तदान शिबिरे घ्यावीत. कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजारांबाबत प्रतिबंधात्मक उपाय आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करावी.

नियमांचे पालन करण्याचे आवाहन
ठाकरे सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही नियमावली जाहीर केली आहे. नागरिकांनी या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रशासनालाही याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येते.

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement