SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रेशन दुकानातून मिळणार गॅस सिलिंडर..? सामान्य नागरिकांचा असा फायदा होणार, वाचा..!

सध्या पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीणे मुश्किल झाले आहे. दुसरीकडे आगामी काळातही ही महागाई कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. अशा वेळी नागरिकांसाठी एक मोठी बातमी आली आहे.

आगामी काळात रेशन दुकानांमधून लहान आकारातील एलपीजी सिलिंडरच्या किरकोळ विक्रीला मोदी सरकार (Modi sarkar) परवानगी देणार असल्याचे समजते. तसेच रेशन दुकानातून आता आर्थिक सेवाही मिळणार आहेत. रेशन दुकानातून स्वस्त दरात गॅस (LPG gas) मिळणार का, याबाबत समजले नाही..

Advertisement

केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आभासी बैठकीत याबाबत विविध राज्य सरकारांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. बैठकीला इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियमसह ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड (CSC)चे अधिकारीही उपस्थित होते. रेशन दुकानांद्वारे लहान LPG सिलिंडरच्या किरकोळ विक्रीची योजना विचाराधीन असल्याचे अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

Advertisement

रेशन दुकानातून वित्तीय सेवा
केंद्राच्या या निर्णयाला तेल मार्केटिंग कंपन्यांच्या प्रतिनिधींनीही पाठिंबा दिला आहे. त्यासाठी इच्छुक राज्य किंवा केंद्र सरकारशी समन्वय साधून आवश्यक सहकार्य करणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच रेशन दुकानांद्वारे वित्तीय सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली.

मुद्रा कर्ज याेजनेचा विस्तार करणार
दरम्यान, मोदी सरकार मुद्रा कर्ज याेजनेचा विस्तार रेशन दुकानदारांच्या माध्यमातून करणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रेशन दुकानदार भांडवल वाढवू शकतील. अन्न सचिवांनी राज्यांना हे उपक्रम हाती घेण्यास आणि त्यांच्या गरजेनुसार तयार करण्यास सांगितले आहे.

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement