SpreadIt News | Digital Newspaper

ही मराठमोळी अभिनेत्री उतरणार राजकीय आखाड्यात, तृणमूल काॅंग्रेसमध्ये करणार पक्षप्रवेश..!

चित्रपटसृष्टी नि राजकारण कायमच एकमेकांशी निगडीत क्षेत्र राहिलेय.. छोटा-मोठा पडदा गाजवल्यानंतर अनेक अभिनेते-अभिनेत्री राजकीय आखाड्यात उतरले. अर्थात, त्यातील काहींना यश मिळाले, तर काहींना राजकीय क्षेत्र मानवले नाही.

आपल्या अदांनी, निखळ सौंदर्याने चित्रपट रसिकांना घायाळ करणारी आणखी प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री राजकारणात उतरणार आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे, वर्षा उसगावकर…!

Advertisement

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी (Mamta Banarji) यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) लवकरच पक्षप्रवेश करणार आहेत. तृणमूल काँग्रेसकडून वर्षा यांच्यावर मोठी जबाबदारीही दिली जाणार असल्याचे बोलले जाते.

ममता दीदी येत्या 28 ऑक्टोबरपासून गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळीच वर्षा उसगांवकर तृणमूल काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

लहानपणीच राजकारणाचे बाळकडू
वर्षा उसगांवकर यांना राजकारणाचे बाळकडू लहानपणीच मिळाले आहे. एका राजकीय कुटुंबाशीच त्या निगडीत आहेत. त्यांचे वडील अच्युत के. एस. उसगांवकर हे गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मोठे नेते होते.

गोवा विधानसभेचे उपसभापती, तसेच एकापेक्षा जास्त वेळा ते मंत्रीमंडळाचे सदस्य राहिले आहेत. मंत्री होण्यापूर्वी अच्युत उसगांवकर यांनी दयानंद बांदोडकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये गोव्याचे उपसभापती म्हणूनही काम पाहिलेले आहे.

Advertisement

तृणमूल काँग्रेसला फायदा होणार
वर्षा उसगावकर यांनी एके काळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली असली, तरी त्या केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर गोव्यातीलही प्रसिद्ध चेहरा आहेत. गोव्यात 75 % हिंदू मतदार आहेत. त्यामुळे वर्षा उसगावकर यांच्या रुपाने हिंदू चेहरा समोर आल्यास, गोव्यात तृणमूल काँग्रेसला फायदा होईल, असे बोलले जाते.

दरम्यान, वर्षा उसगावकर यांच्यासह आणखी काही महत्त्वाचे चेहरे तृणमूल काॅंग्रेसमध्ये येणार आहेत. त्यात नफिसा अली सोधी, लकी अली, रेमो फर्नांडीज यांची नावे चर्चेत आहेत. पक्ष विस्तारात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचीही महत्त्वाची भूमिका ठरणार आहे.

Advertisement

मराठी-हिंदी चित्रपटांमधून, मालिकांमधून वर्षा उसगावकर यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडलीय. आताही त्या ‘सूख म्हणजे नक्की काय असतं…’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता त्या राजकीय आखाड्यात उतरणार असल्याने तेथे कसे काम करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement