SpreadIt News | Digital Newspaper

🏏 T-20 Worldcup: भारतासाठी करो या मरो! पुढील सर्वच सामने जिंकावे लागणार?

🏆 टी -20 वर्ल्डकपमध्ये पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाचा संपूर्ण खेळ खराब झाला आहे. या पराभवामुळे उपांत्य फेरी गाठण्यासाठी संघाला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. तरी भारतीय संघात पुढील सामन्यासाठी शार्दूल ठाकुर (Shardul Thakur), आर. अश्विन (R. Ashwin) , ईशान किशन (Ishan kishan) (Howzat) यांचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे.

🧐 सेमिफायनलमध्ये टीम इंडिया कशी पोहोचेल?

Advertisement

👉 टीम इंडियाचा ग्रुप 2 मध्ये समावेश आहे. भारत (Team India)आणि पाकिस्तान सोडून अफगाणिस्तान, न्यूझीलंड, स्कॉटलंड आणि नामिबियाचे संघ आहेत. या 6 संघांपैकी फक्त 2 अव्वल संघांना सेमिफायनलमध्ये प्रवेश मिळणार आहे. म्हणजेच सेमिफायनल गाठण्यासाठी प्रत्येक संघाला किमान 4-5 सामने जिंकावे लागणार आहेत.

👉 फक्त दोनच संघ सेमिफायनलसाठी पात्र ठरतील. म्हणजे टीम इंडियाला फक्त उर्वरित सर्व सामने फक्त जिंकावे लागणार नाहीत, तर मोठ्या फरकानं जिंकणे आवश्यक आहे. या गटात अफगाणिस्तानसह एकूण 4 संघ मजबूत स्थितीत आहेत. यापैकी दोन टीम सेमी फायनलपूर्वी बाहेर जातील.

Advertisement

👉 सध्या पाकिस्तान 2 गुणांसह ग्रुप 2 मध्ये अव्वल आहे. 10 गडी राखून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात. सध्या भारताचा नेट रन (Run Rate) (dream11) रेट -0.973 आहे. नेट रनरेटवरही हे प्रकरण अडकू शकतं, म्हणून भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवावे लागतील. अशा स्थितीत टीम इंडियाला आगामी सामन्यांमध्येही रनरेट सुधारावा लागणार आहे.

🧢 भारताचे उर्वरित सामने

Advertisement

भारत पहिल्या फेरीतून पात्र झालेल्या दोन संघांशी स्पर्धा (T-20 Worldcup Matches) करेल ते म्हणजे स्कॉटलंड आणि नामिबिया. या दोन संघांविरुद्ध टीम इंडियाला सहज विजय मिळू शकतो, पण उर्वरित संघांविरुद्ध विजयाची शाश्वती देणं कठीण आहे.

▪️ 31 ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड
▪️ 03 नोव्हेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान
▪️ 05 नोव्हेंबर – भारत विरुद्ध स्कॉटलंड
▪️ 08 नोव्हेंबर – भारत विरुद्ध नामिबिया

Advertisement