अहमदनगरमधील अकोले तालुक्यातल्या धामणगाव पाट या गावात एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विम्याचे 37 कोटी रुपये मिळवण्यासाठी चक्क एका मनोरुग्णाचा खून करून स्वतःच्या मृत्यूचा बनाव केला. या प्रकरणाचा इन्शुरन्स कंपनीच्या सावधानतेमुळे भांडाफोड झाला आहे. यात मुख्य आरोपी सह पाच जणांना अटक करण्यात आली, अशी माहीती पाेलिस अधीक्षक मनाेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोट्यावधींच्या लालसेपोटी आखला प्लॅन
अहमदनगरच्या अकोले तालुक्यातल्या राजूरमधील धामणगाव पाट येथील मागील वीस वर्षापासून अमेरिकेत स्वयंपाकीची नोकरी करणाऱ्या प्रभाकर वाकचौरे यांनी 2013 साली बायकोचा 10 लाख डॉलरचा आणि स्वतःचा 50 लाख डॉलरचा अमेरिकेत ऑल स्टेट इन्शुरन्स (All State Insurance) कंपनीकडे इन्शुरन्स काढला.
प्रभाकर भीमाजी वाघचौरे नावाचा व्यक्ती 20 वर्षांपासून अमेरिकेत राहत होता. इन्शुरन्सचा क्लेम मिळवण्यासाठी तो जानेवारी महिन्यात आपल्या गावी आला. भारतात परतल्यानंतर काही दिवसांत 22 एप्रिलला राजूर पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांना स्थानिक शासकीय रुग्णालयातून प्रभाकर वाघचौरे याच्या मृत्यूचा रिपोर्ट मिळाला होता.
जेव्हा एक पोलीस कॉन्स्टेबल रुग्णालयात गेला तेव्हा एका व्यक्तीने स्वत:ला वाघचौरे याचा नातेवाईक असल्याचे सांगितले. पोलिसांनी प्राथमिक वैद्यकिय रिपोर्ट मिळवत या रिपोर्टमध्ये साप चावल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे बघितले, तर वाघचौरे याच्या जीवन बीमाचा (Life Insurance Corporation) तपास करत असलेल्या बीमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा अहमदनगर पोलिसांना संपर्क करुन त्याच्या मृत्यूबद्दल अधिक माहिती मागितली असता सत्य घटनेचा खुलासा झाला.
मनोरुग्णाच्या हत्येचा कट
आरोपींना वाघचौरे याच्यासारखा दिसणारा एक निराधार व्यक्ती भेटला. त्याच्या गावातील या मनोरुग्ण व्यक्तीचा विषारी सापाच्या दंशाने खून करून स्वतःचा मृत्यू झाल्याचे पुरावे तयार केले. मग आपल्या चार साथीदाराच्या मदतीने चार महिने नियोजन करून करून कट रचला. वाघचौरे याने स्वत:चा मृत्यू झाल्याची सुचना पोलिसांना दिली होती.
विमा कंपनीला संशय आल्याने त्यांनी राजूर पोलिसांची मदत घेतली. त्यावेळी प्रभाकर वाकचौरे जिवंत असल्याचे समोर आले. पोलिसांनी प्रभाकरला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर प्रभाकर आणि त्याच्या चार साथीदारांनी त्या मनोरुग्णाची विषारी सापांच्या दंशाने हत्या केल्याची माहिती दिली. घडलेला सर्व प्रकार समोर आला.
अहमदनगर एसपी मनोज पाटील यांनी सोमवारी असे म्हटले की, बीमा तपासकर्त्यांनी वाघचौरे याच्या मृत्यूच्या दाव्यावर सखोल तपास सुरु केला. कारण त्याने 2017 मध्ये जीवन बीमा (LIC Jeevan Bima) दाव्यासाठी आपल्या पत्नीच्या मृत्यूचा दावा करत फसवणूक केली होती. त्याची पत्नी जीवंत आहे. तपासातून असे ही कळले की, त्याने एका सर्पमित्राकडून कोब्रा खरेदी केला होता”, असं ते म्हणाले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511