SpreadIt News | Digital Newspaper

दिवाळीला स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारची विशेष योजना जाणून घेण्यासाठी वाचा..!

भारतीयांना सुरवातीपासून सोन्याबाबत आकर्षण राहिलेले आहे. कधी मिरवण्यासाठी, तर कधी सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक जण सोने खरेदी करीत असतात. अशा नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, त्यांना आता अगदी स्वस्तात सोने खरेदी करता येणार आहे.

केंद्र सरकारच्या वतीने रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत (RBI) सार्वभौम सुवर्ण रोख्यांची विक्री (Sovereign Gold Bond Scheme) केली जाते. ग्राहकांना निर्धारित बँकांच्या इंटरनेट बँकिंग, अथवा प्रत्यक्ष शाखेतून, तसेच टपाल कार्यालयातूनही हे रोखे खरेदी करता येतात.

Advertisement

यापूर्वी या योजनेचे 6 टप्पे झाले असून, केंद्र सरकारने आगामी 4 टप्प्यांची घोषणा केली आहे. त्यानुसार सोमवारपासून (२५ ऑक्टोबर) 7 वा टप्पा सुरू झाला. दिवाळीच्या तोंडावर धनत्रयोदशीला (२ नोव्हेंबर) हे रोखे जारी केले जाणार आहेत. मात्र, त्यासाठी २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावा लागणार आहे.

किती असेल सोन्याची किंमत..?
दरम्यान, सुवर्ण रोखे विक्रीच्या 7 व्या टप्प्यात सोन्याची किंमत ४,७६५ रुपये प्रति ग्रॅम इतकी निश्चित करण्यात आली आहे. एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय, तसेच दिवाळीत होणारी पारंपरिक खरेदी पाहता, गुंतवणूकदारांचा कल सुवर्ण रोख्यांकडे राहण्याची शक्यता आहे.

Advertisement

‘डिजिटल’ माध्यमातून सुवर्ण रोखे खरेदी करणाऱ्यासाठी प्रति ग्रॅम ५० रुपयांची सवलत मिळणार आहे. म्हणजेच त्यांना ४,७१५ रुपये प्रति ग्रॅमप्रमाणे सोने खरेदी करता येणार आहे. शिवाय ८ वर्षे मुदतीच्या रोख्यांवर दरसाल २.५ टक्के व्याजही मिळणार आहे.

सुवर्ण रोखे विक्रीचे टप्पे
– आठवा टप्पा- २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर 2021
– नववा टप्पा – १० ते १४ जानेवारी २०२२
– दहावा टप्पा – २८ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२२

Advertisement

दरम्यान, एका आर्थिक वर्षांत व्यक्ती वा अविभक्त हिंदू कुटुंबांना (एचयूएफ) कमीत कमी १ ग्रॅम ते जास्तीत जास्त 4 हजार ग्रॅम सुवर्ण रोखे  खरेदी करता येतील. ट्रस्ट व तत्सम संस्थांना 20 हजार ग्रॅम सुवर्ण रोखे एका आर्थिक वर्षांत खरेदी करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement