नवाब मलिकांचा लेटर बॉम्ब: समीर वानखेडेंनी केलेल्या ‘त्या’ 26 कारवायांवर प्रश्नचिन्ह? पत्रात काय, वाचा..
आर्यन खान प्रकरणात (Aryan Khan Case) रोज नवे आरोप होत असून प्रकरणाला आता वेगळं वळण मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते (NCP spokesperson) नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ‘एनसीबी’चे विभागीय संचालक (Divisional Director, NCB) समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याबाबत अजून एक मोठा आणि अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंनी केलेल्या 26 कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केला आहे. नवाब मलिक यांनी एक ट्विट करत समीर वानखेडेंच्या कारवायांबाबत एक पत्र प्रसिद्ध केले आहे.
दरम्यान समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद, तर आईचे नाव झहिदा आहे. त्यांनी खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवली आहे. जे जन्म प्रमाणपत्र आम्ही ट्विट केलं आहे ते खरं आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे प्रमाणपत्र आम्ही जात पडताळणी समितीकडे देणार आहोत, त्यातून सत्य बाहेर येईल, असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सोमवारी म्हटले होते. तसंच,समीर वानखेडे यांच्या जन्म दाखलाच ट्विटरवर पोस्ट केला आहे.समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांचे हे आरोप फेटाळले आहेत.
पत्रात काय?
एनसीबीमधील एका अधिकाऱ्याने पाठवलेल्या निनावी पत्र एक जबाबदार नागरिक म्हणून मी डीजी नार्कोटिक्स यांना पाठवणार आहे. आता समीर वानखेडेच्या चौकशीमध्ये हे पत्र समाविष्ट करण्याची विनंती केली आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
पत्रात ‘एनसीबीमध्ये काही बोगस अधिकाऱ्यांची टोळी तयार झाली आहे. ही टोळी लोकांना ड्रग्सच्या केसमध्ये फसवते. अशा 26 केस असल्याचं’, म्हटलंय. नवाब मलिक यांनी हे पत्र प्रसिद्ध केल्यानंतर दिलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. तसेच समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याच्या दाव्याचा नवाब मलिक यांनी पुनरुच्चार केला आहे.
पत्रात अनेक धक्कादायक खुलासे:
पत्रात एनसीबीचा अधिकारी म्हणतो की, एनसीबीचे आधीचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी समीर वानखेडे यांना अमित शाहांना सांगून नियमबाह्य पद्धतीने झोनल डायरेक्टर पदावर नियुक्त केले. तसेच समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा यांना बॉलिवूडला सर्व मार्ग अवलंबून ड्र्ग्सच्या प्रकरणात अडकवण्याचे आदेश दिले.
त्यानुसार दोन्ही अधिकाऱ्यांनी बॉलिवूड कलाकारांवर खोटे गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल झाल्यावर मल्होत्रा आणी समीर वानखेडे यांनी या कलाकारांकडून कोट्यवधींची मागणी केली. ही वसुली बॉलिवूडचे कलाकार (दीपिका पदुकोण, करिश्मा प्रकाश, श्रद्धा कपूर, रकूल प्रीत सिंह, सारा अली खान, भारती सिंह, हर्ष लिम्बाचिया, रिया चक्रवर्ती, सोविक चक्रवर्ती, अर्जुन रामपाल) यांच्याकडून वकील अय़ाज खानने घेतले.” हे पत्र ट्विट करत नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केला आहे. समीर वानखेडे हे एक खंडणीखोर अधिकारी असून, प्रसार माध्यमांमध्ये चर्चेत राहणे त्यांना आवडते, असा दावाही या पत्रातून करण्यात आला आहे.
‘स्पेशल 26’ ची लवकरच घोषणा?
पत्राबाबतचे ट्विट करण्यापूर्वी नवाब मलिक यांनी आणखी ट्विट करत लवकरच स्पेशल 26 ची घोषणा करणार असल्याचा इशारा दिला. दरम्यान, एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने नवाब मलिक यांना पाठवलेल्या निनावी पत्रामध्ये समीर वानखेडेंनी हाताळलेल्या ड्रग्स प्रकरणातील 26 केसचा उल्लेख आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511