SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खुशखबर! शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; खात्यात जमा होणार 3 हजार 600 कोटींची मदत

कृषिमंत्री दादा भुसे यांनी जालना (jalana) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृषि आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्र, नुकसानग्रस्त पिके आणि निधी वाटपाबद्दलची माहिती दिली.

शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे येणार?

Advertisement

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात आणि इतर जिल्ह्यातील सुमारे 55 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून शासन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम वर्ग करणार आहे.

अतिवृष्टीमुळे जून महिन्यात शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी 3 हजार 600 कोटी (3,600 Crores) रुपयांचा निधी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

Advertisement

अतिवृष्टीमुळे 55 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून त्यापैकी 70% नुकसान हे मराठवाडा विभागात झाले आहे. त्यामुळे मदतीचा पहिला टप्पा हा मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्राधान्याने वर्ग करण्यात येत आहे.

मदत म्हणून पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 350 कोटी रुपये (350 crores) जमा करण्याची प्रक्रिया अधिक वेगाने सुरू आहे, असं मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सांगितलं.

Advertisement

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करत दिली महत्वाची माहीती

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 2 हेक्टरपर्यंत जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर तसेच बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति अशी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचंही अशोक चव्हाण यांनी ट्विट करून सांगितलं आहे.

Advertisement

राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे हातातोंडाशी आलेले पिकं पाण्यात वाहून गेल्याने ऐन दिवाळीच्या सणावर शेतकरी हताश झाला आहे. या नुकसानीची लवकरच भरपाई म्हणून आर्थिक मदत केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांची दिवाळी गोड करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे.खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले, त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना या पैश्याची मदत होवून आधार मिळावा हा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे, असं मंत्री विजय वडेट्टीवार ट्विट करत म्हणाले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement