SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शोएब अख्तरने भारतीयांच्या जखमेवर चोळले मीठ; हरभजन सिंगला म्हणाला ‘असं’ काही…

जगाचं लक्ष वेधलेल्या काल (ता.24) झालेल्या ICC T-20 Worldcup क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर 10 गडी राखून विजय (pakistan won By 10 wickets) मिळवला. दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात होते. मात्र, भारतीय संघाला अपेक्षित खेळ करता आला नाही.

पाकिस्तानने 152 धावांचे लक्ष्य 17.5 षटकांतच गाठत ट्वेन्टी-20 विश्वचषकात भारतावर सहा प्रयत्नांत पहिल्या विजयाची नोंद केली. पाकिस्तानचे सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) आक्रमक खेळी केली. मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) 55 चेंडूत 6 चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने नाबाद 79 धावांची, तर आझमने 52 चेंडूत सहा चौकार, दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 68 धावांची खेळी साकारली.

Advertisement

तुमच्या माहितीकरिता सांगायचं झाल्यास, भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1992 ते 2019 पर्यंत एकूण 12 विश्वचषक (एकदिवसीय आणि टी-20 सह) सामने खेळले गेले होते आणि ते सर्व भारताने जिंकले आहेत. यावरून भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने शोएब पाकिस्तानला टोमणे मारले असल्याचं कळतंय.

भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंगने जेव्हा सामन्यापूर्वी ‘पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये पराभव पत्करावा लागतो, तेव्हा तो भारताविरुद्ध खेळत का राहतो?’, असे म्हटले होते. यानंतर पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तरने ट्विट करत विचारले की, भज्जीला अजून वॉकओव्हरची गरज आहे का? असं म्हटलं आहे.

Advertisement

भारत आणि पाकिस्तानच्या अनेक माजी खेळाडूंमध्ये चांगली मैत्री आहे. पण सध्या शोएब अख्तर आणि हरभजन सिंग हे दोघेही जाहीरपणे टिप्पणी करण्याची किंवा एकमेकांना टोमणे मारण्याची संधी सोडत नाहीत. काही दिवसांपूर्वी हरभजन सिंगने पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषकात भारताच्या उत्कृष्ट विक्रमाचा दाखला देत पाकिस्तानने भारताला या सामन्यात वॉकओव्हर द्यावा, असे म्हटले होते.

Advertisement

भज्जीने या सामन्यापूर्वी म्हटले होते की, भारताला पाकिस्तानविरुद्ध सहज विजय (walkover) मिळायला हवा’, असं म्हटलं होतं. यावर पाकिस्तानच्या विजयानंतर शोएब अख्तरने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं की, “होय भज्जी हरभजन सिंगला वॉकओव्हर घ्यावा लागेल? नाही घ्यायचा का? बरं चला, तुम्ही काय करू शकता. आराम करा, दिवसाचा आनंद घ्या आणि सहन करा”, असं म्हटलं आहे. सामन्याचा निकाल येताच अख्तरने ट्विट करून विचारले की, ‘हरभजन सिंग तू कुठे आहेस?’, असंही ट्विटरवर लिहीत पोस्ट केली आहे. या सामन्यात भारत पूर्णपणे अपयशी ठरला. नाणेफेक जिंकण्यापासून सामना जिंकण्यापर्यंत, पाकिस्तानने भारताला सामन्यात परतण्याची संधी दिली नाही.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement