SpreadIt News | Digital Newspaper

समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ, तातडीने दिल्लीला बोलाविले…

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांच्या खळबळजनक आरोपानंतर ‘एनसीबी’ (NCB)चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्‍या अडचणीत वाढ झाली आहे. आता याप्रकरणी वानखेडे यांची खात्‍या अंतर्गत चौकशी केली जाणार असल्‍याचे ‘एनसीबी’ने स्‍पष्‍ट केले आहे.

‘एनसीबी’चे पंच प्रभाकर साईल याने मुख्य पंच किरण गोसावी, तसेच वानखेडे यांच्यावर रविवारी (ता. 24) गंभीर आरोप केले होते. आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याचे वडील अभिनेता शाहरूख खान (Shahrukh khan) याच्याकडे २५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. पैकी 8 कोटी रुपये हे वानखेडे यांना देण्यात येणार असल्याचा सनसनाटी आरोप साईल याने केला होता.

Advertisement

आर्यन खानला सोडण्यासाठी ही डिलिंग होणार होती, असा दावा प्रभाकर साईल यांनी केलाय. तसेच मला 10-12 कोऱ्या कागदांवरच सह्या करायला लावल्याचा दावाही साईल याने केला होता. ‘एनसीबी’च्या दिल्ली मुख्यालयाने साईल याच्या या आरोपांची गंभीर दखल घेतली आहे.

समीर वानखेडे यांना दिल्लीला बोलाविले
समीर वानखेडे यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आले आहे. वानखेडे यांची दिल्लीत खात्याअंतर्गत चौकशी होणार आहे. ‘एनसीबी’चे मुख्‍य दक्षता अधिकारी ज्ञानेश्‍वर सिंह हे स्वत: वानखेडे यांची चौकशी करतील. तसेच, प्रभाकर साईल याचीही चौकशी केली जाणार असल्याचे समजते.

Advertisement

याबाबत ‘एनसीबी’चे मुख्‍य दक्षता अधिकारी ज्ञानेश्‍वर सिंह म्हणाले, की “या प्रकरणाबाबत आताच काही बाेलता येणार नाही. समीर वानखेडे यांची लवकरच चाैकशी हाेईल. मात्र, आताच त्यावर बाेलणे चुकीचे ठरेल. चौकशी सुरू झाल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल..”

दरम्यान, समीर वानखेडे आजच दिल्लीला रवाना होणार आहेत. ते संध्याकाळपर्यंत दिल्लीत पोहोचतील. त्यानंतर त्यांची खात्यांतर्गत चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात येते.

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement