SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

किचन टिप्स: या दिवाळीत फराळ बनवताना ‘या’ 10 गोष्टी नक्की लक्षात ठेवा…

दिवाळी म्हटलं की फराळाच्या पदार्थांनी भरलेलं ताट नुसतं समोर येतं ना? लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे फराळाचे पदार्थ करण्यात बहुतेक जण व्यस्त होऊन जातात.

दिवाळीच्या सणामध्ये (Diwali Festival) रवा असो वा बेसन लाडू (Laddu), शंकरपाळे (Shankarpali) , करंज्या (Karanji), चकली (Chakli), चिवडा (Chivda), शेव (Shev), अनारसे (Anarse), बर्फी (Barfi) वगैरे बरंच काही फराळ करण्यासाठी Diwali Festival Faral, Snacks) आणि ताव मारण्यासाठी आपण वाटच पाहत असतो. पण तुम्हाला हे सगळं करताना वेगवेगळ्या अडचणी येतात. कुठल्या पिठात पाणी कमी पडतं तर कुठे जास्त! इथपासून सुरुवात होते की बस्स पुढे एक ना एक चालू राहतं..मग यासाठी काहीतरी सोपं होऊन सगळे पदार्थ चमचमीत झाले तर? चला पाहू…

Advertisement

लाडू-करंज्या न बिघडण्यासाठी काही सोप्या गोष्टी:

▪️ आपण करंज्या करून जेव्हा तेलात टाकतो तेव्हा त्या फुटतात. मग आतले सारण तेलात पसरते आणि ते जळते. तेलही खराब होते. यासाठी त्या कडांना कापसाच्या बोळ्याने दूध लावावे.

Advertisement

▪️ करंज्या करताना चांगल्या तुपाचे मोहन घालावे. चांगले तूप जर नसेल किंवा तुपातील करंजी आवडत नसेल, तर तेलाचे मोहनही चालते. हे मोहन थंड झाल्यावर त्या पीठाला काही वेळ चांगले मळून घ्या.

▪️ करंज्याचे पीठ नीरशा दुधात तिंबावे. अर्ध्या तासाने लगेचच करंज्या करायला घ्याव्यात. यामुळे करंज्या अतिशय सुंदर खुसखुशीत, जरा नरम होतात.

Advertisement

▪️ करंज्या जर साटं लावून करणार असाल तर साटं करताना त्यामध्ये तेल व तूप समान प्रमाणात घाला.

▪️ करंजीच्या वरचा जो भाग असतो म्हणजेच आवरण. या आवरणासाठी भिजवलेले पीठ अगदी शेवटपर्यंत मऊ राहण्यासाठी पीठ भिजवलं की, सुती कापड ओले करुन ते त्याच्या भोवती गुंडाळून घ्या.

Advertisement

▪️ रव्याच्या लाडूसाठी रवा भाजल्यावर खाली उतरवून त्यावर चार चमचे दूध शिंपडावे. रवा छान फुलतो. लाडूला छान चव येते.

▪️ रवा लाडू छान होण्यासाठी पाक झाला ली, त्यात थोडीशी मिल्क पावडर घालावी त्यानंतर भाजलेला रवा घालावा. यामुळे लाडू तोंडात विरघळेल इतका मऊ होतो.

Advertisement

▪️ तसेच, बेसनाचे लाडू चांगले होण्यासाठी बेसन खमंग भाजून घेतल्यावर त्यावर एक वाटीला एक चमचा दूध असे दूध शिंपडा. लाडूला छान खमंग चव येते आणि चविष्ट लागतात.

▪️ बेसन भाजून घेतल्यानंतर बेसनाचे लाडू करताना ते आधी कोमट असताना एका वाटीसाठी एक चमचा मिल्क पावडर घातली की, बेसन लाडू अतिशय छान होतात.

Advertisement

▪️ बेसनाच्या लाडूला तूप योग्य प्रमाणात घ्यावे. नाहीतर लाडू खूप सैल होतात नाहीतर जास्त कडक होतात.

(वरील सर्व टिप्स किंवा रेसिपी करताना आपण एक ट्रायल नक्की घ्या. म्हणजे त्यानुसार आपल्याला अंदाज येईल.)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement