SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जिओचा धमाकेदार रिचार्ज प्लॅन लाॅंच, अवघ्या 98 रुपयांत राेज 1.5 GB डेटा मिळणार..!

मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) या भारतातील आघाडीच्या कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार रिचार्ज प्लॅन आणला आहे. विशेष म्हणजे, अन्य कोणतीही कंपनी इतक्या स्वस्त प्लॅन देत नसल्याचे दिसते.

‘रिलायन्स जिओ’चा हा खास प्लान फक्त ९८ रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज चक्क १.५ जीबी डेटा दिला जाणार आहे. जिओच्या या प्लॅनला टक्कर देईल, असा कोणताही प्लॅन सध्या तरी ‘एअरटेल’ (Airtel) किंवा ‘वोडाफोन-आयडिया’ (VI) यांच्याकडे नसल्याचे दिसते.

Advertisement

रिलायन्स जिओच्या या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सला कोणकोणते फायदे मिळणार आहेत, याबाबत जाणून घेऊ या…

जिओचा 98 रुपयांचा प्लॅन

Advertisement
  • प्लॅनची वैधता – 14 दिवस
  • डेटा- दररोज 1.5GB हायस्पीड डेटा. (१४ दिवसांत युजर्सना एकूण 21 GB डेटा मिळणार)
  • कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंग
  • जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शनही उपलब्ध.
  • एसएमएस पाठवण्याची सुविधा

‘वोडाफोन-आयडिया’चे प्लन
‘वोडाफोन-आयडिया'(VI)कडे सध्या १९ रुपये व ९९ रुपयांचे सर्वात स्वस्त प्लॅन आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये ‘अनलिमिटेड कॉलिंग’चा फायदा मिळतो. मात्र, १९ रुपयांच्या प्लॅनची वैधता २ दिवसांची, तर २०० एमबी डेटा मिळतो.

तसेच ९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १८ दिवसांची वैधता, एकूण २०० एमबी डेटा मिळतो. दोन्ही प्लॅनमध्ये ‘एसएमएस’ पाठविण्याची सुविधा मिळत नाही.

Advertisement

‘एअरटेल’चा स्वस्त प्लान
एअरटेल (Airtel) कंपनीकडे १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत १९ रुपयांचा ‘रिचार्ज प्लान’ आहे. मात्र, त्याची वैधता २ दिवसांची असून, २०० एमबी डेटा मिळतो. तसेच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. ‘एसएमएस’ची सुविधाही मिळत नाही.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement