SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या धाडी; तपासात ‘हे’ आलं समोर..

राज्यात एकीकडे सीबीआय आणि ईडीने कारवाई सुरु केली असताना दुसरीकडे आयकर विभागाने कांद्याची साठेबाजी आणि त्यातून होणारी भाववाढ रोखण्यासाठी, नाशिकमधील दहाहून अधिक कांदा व्यापाऱ्यांवर गेल्या चार दिवसांपासून धाडी घालण्याचं काम सुरु केलं आहे.

कोट्यवधींच्या बेहिशेबी मालमत्ता जप्त?

Advertisement

कांद्याची साठेबाजी, भाववाढ आणि अचानक होणाऱ्या चढ-उतारामुळे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केल्याचे समोर येत आहे. कांद्याची आवक, खरेदी-विक्रीवर नजर ठेवून असणाऱ्या आयकर विभागाने पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील 6 कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांची कसून तपासणी केल्याचं समजतंय.

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात गेल्या काही दिवसांपासून खळबळ उडाली आहे. आयकर विभागाचे 100 हून जास्त अधिकारी, कर्मचारी यांनी हे धाडसत्र सुरु केलं असून त्यात जवळपास 26 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम आणि 100 कोटी रुपयांहून अधिक बेहिशोबी मालमत्ता सापडल्याची माहिती आहे. जप्त केलेल्या या मालमत्तेत शंबर, दोनशे, पाचशे आणि दोन हजारांच्या नोटांचा भरणा आहे. आयकर विभागाला ही रक्कम मोजायला तब्बल एक दिवस लागल्याचं कळतंय.

Advertisement

काही व्यापारी कांद्याची साठेबाजी करून बाजारात कांद्याची कमतरता भासण्यासाठी परिणामत: भाववाढ होऊन पैसा हाती येण्यासाठी असं करतात. जवजवळ बहुतांश व्यापारी कांद्याची साठेबाजी करतात. तरी आयकर विभागाने कोट्यवधींची मालमत्ता जप्त केल्याची माहीती आहे. कोणताही लेखी हिशेब या व्यापाऱ्यांकडे नसल्याची माहितीही मिळाली आहे. असं तपासात दिसून आलं की, या व्यापाऱ्यांच्या घरांवर, कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या असून त्यांच्या बँक अकाऊंटचीही माहिती घेण्यात येत आहे.

दरम्यान, आयकर विभागाने पहिल्यांदाच कांदा व्यापाऱ्यांवर छापेमारी केलेली नाही. यापूर्वीही नाशिकमधील कांदा व्यापारी आयकर विभागाच्या रडारवर होते. त्यावरुन केंद्र-राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपही झाले होते. आयकराने जप्त केलेल्या या मालमत्तेचं पुढं काय केलं जाणार, या व्यापाऱ्यावर पुढे काय कारवाई केली जाईल आणि या व्यापाऱ्यांचे नाव जाहीर करण्यात येणार का, असे अनेक प्रश्न आहेत. अद्याप आयकर विभागाकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement