SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आयपीएलमध्ये दोन नव्या संघांची एन्ट्री..! ‘या’ शहरांच्या नावाने संघ उतरणार, रकमेचे आकडे पाहून डोळे पांढरे होतील..

इंडियन प्रीमिअर लीग, अर्थात ‘आयपीएल’च्या (IPL-2022) आगामी पर्वासाठी लखनौ व अहमदाबाद या शहरांच्या नावांनी दोन नवे संघ दाखल झाले आहेत. त्यामुळे आगामी ‘आयपीएल’मध्ये आता 8 ऐवजी 10 संघ खेळताना दिसणार आहेत.

दुबईतील ताज हॉटेलमध्ये या दोन संघांसाठीची लिलाव प्रक्रिया झाली. त्यासाठी 22 कंपन्यांनी 10 लाख रुपये भरुन निविदा कागदपत्रे घेतली होती. त्यात जवळपास ४ तासांच्या छाननीनंतर १० निविदा अंतिम करण्यात आल्या.

Advertisement

अखेरच्या टप्प्यात चार कंपन्यांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. त्यात ऑल कार्गो (All Cargo), लाॅजिस्टिक्स (Logistics), अदानी ग्रुप्स (Adani Group), आर. पी. संजीव गोयंका (RP Sanjiv Goenka) नि उदय कोटक (Uday Kotak) यांच्यात चढाओढ सुरु असल्याचे दिसून आले.

संजीव गोयंका यांनी बाजी मारली
अखेर संजीव गोयंका यांनी सर्वाेच्च ७००० कोटींची बोली लावत लखनौ फ्रँचायझीचे मालकी हक्क घेतले. गोयंका यांच्याकडे याआधी ‘पुणे रायजिंग सुपरजायट्सं’ फ्रँचायझीचे मालकी हक्क होते. हा संघ दोन वर्षे ‘आयपीएल’ खेळला आहे.

Advertisement

‘आयपीएल’मध्ये पुन्हा एकदा ‘एन्ट्री’ केल्याने संजीव गोयंका यांनी आनंद व्यक्त केला. “हे पहिलं पाऊल असून, आता एक चांगली टीम तयार करण्याचे आव्हान आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

सीव्हीसी कॅपीटल दुसरी फ्रँचायझी
दरम्यान, सीव्हीसी कॅपीटल (CVC Capital) यांनी या लिलावात दुसरी सर्वाधिक ५,२०० कोटी रुपयांची बोली लावत फ्रँचायझी आपल्या नावे केली. अहमदाबाद फ्रँचायझीचे मालकी हक्क त्यांनी घेतले.

Advertisement

अदानी ग्रुप व मँचेस्टर युनायटेड यांनाच दोन नव्या संघांचे मालकी हक्क मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. गौतम अदानी आणि त्यांच्या समूहाने अहमदाबाद फ्रँचायजीसाठी बोलीही लावली. मात्र, नंतर त्यांनी माघार घेतली. त्यामुळे अदानी ग्रुप व मँचेस्टर युनायटेड यांची फ्रँचायझी आयपीएलमध्ये दिसणार नाही.

दरम्यान, सीव्हीसी कॅपीटलने नुकतीच ‘ला लिगा क्लब’मध्येही बोली जिंकली होती. शिवाय त्यांचा ‘फॉर्म्युला वन’ आणि ‘रग्बी’ संघ आहे. आता आयपीएलमध्येही त्यांची एन्ट्री झाली आहे.

Advertisement

धोनीमुळे ‘या’ कंपनीचा अर्ज बाद
नव्या संघांसाठी बोली लावणाऱ्यांमध्ये ‘ऱ्हीती स्पाेर्ट्स’ (Rhiti Sports) ही कंपनीही उतरली होती, परंतु या कंपनीचा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याच्यासोबत करार आहे. धोनी ‘सीएसके’ (csk) संघाचा कॅप्टन आहे. त्यामुळे ‘ऱ्हीती स्पाेर्ट्स’ यांचा अर्ज अपात्र ठरविण्यात आला.

प्रसारणातून ३६ हजार कोटी मिळणार?
दोन नव्या संघांसाठी कमीत कमी ३५०० कोटी रुपयांची बोली लागण्याची अपेक्षा होती. मात्र, अपेक्षापेक्षा अधिक बोली लागल्याने बीसीसीआय मालामाल झाली आहे. शिवाय ‘आयपीएल’ प्रसारणापोटी जवळपास ५ बिलियन डॉलर (३६ हजार कोटी) मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुपमध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement