SpreadIt News | Digital Newspaper

झोमॅटोने पाकिस्तानी चाहत्यांना डिवचलं, मैदानाबाहेर रंगला असा हायहोल्टेज ड्रामा..!

टी-२० वर्ल्ड कपमध्ये आज (ता. २४) सायंकाळी पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. मात्र, त्याआधीच मैदानाबाहेर हायहोल्टेज ड्रामा रंगला आहे. दोन्ही देशातील चाहते सोशल मीडियावर एकमेंकाना डिवचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या निमित्ताने तब्बल दोन वर्षांनी भारत व पाकिस्तान संघ आमने-सामने उभे ठाकले आहेत. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

Advertisement

चाहत्यांकडून दावे-प्रतिदावे सुरु असताना, त्यात भारतात फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो (Zomato) कंपनीने उडी घेतलीय. पाकिस्तान संघाला डिवचणारे ट्विट झाेमॅटोने केलं नि अवघ्या तासांत त्यावर लाईक्स नि कमेंट्सचा पाऊस पडला.

झोमॅटोने काय म्हटलंय..?
2019 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानी संघाचा दारुण पराभव केला होता. त्यावेळी एका पाकिस्तानी चाहत्यांनी आपल्या संघातील काही खेळाडू सामन्यापूर्वी बर्गर (Burger), पिझ्झा (Pizza) खाण्यासाठी गेले व त्यामुळेच सामन्यात ते आळस देत होते, असा दावा केला होता.

Advertisement

या सामन्याचा संदर्भ देताना, झोमॅटो कंपनीने एक ट्विट केलंय. त्यात झोमॅटो कंपनीनं म्हटलंय, की “प्रिय पाकिस्तान संघ, आज रात्रीसाठी तुम्हाला बर्गर आणि पिझ्झा हवा असल्यास थेट मेसेज करा..!”

Advertisement

पाकिस्तानी कंपनीचे उत्तर
झोमॅटो कंपनीने केलेल्या या ट्विटमुळे पाकिस्तानी चाहते चांगलेच चिडल्याचे दिसत आहे. त्यात ‘करिम पाकिस्तान’ (Careem Pakistan) नावाच्या कंपनीने उत्तर दिलेय.. “काळजी करु नका, आम्ही पाकिस्तान संघाला मोफत पिझ्झा आणि बर्गर देत आहोत नि तुमच्यासाठी फँटेस्टिक चहा पाठवित आहोत…”

भारत आणि पाकिस्तानमधील या दोन्ही कंपन्यांनी आरोप-प्रत्यारोप करीत सोशल मीडियावरील वातावरण आणखी तापवण्याचा प्रयत्न केलाय.

Advertisement