SpreadIt News | Digital Newspaper

पाकिस्तानकडून पराभवाची मालिका खंडित, टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पराभव, नेमकं कुठे चुकले, वाचा..?

पाकिस्तानविरुद्धची टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाची विजयाची मालिका अखेर खंडित झाली. पाकिस्तानच्या संघाने टीम इंडियाला अगदी सहज मात दिल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम याने टाॅस जिंकून प्रथम बाॅलिंगचा निर्णय घेतला. फास्ट बाॅलर शाहिन शाह आफ्रिदीनं सुरुवातीला धक्के देत भारतीय ओपनर जोडी के. एल. राहुल व रोहित शर्मा यांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर भारतीय संघाला सूर्यकुमार यादवकडून खूप अपेक्षा होत्या.

Advertisement

सूर्यकुमारने सुरुवातही झोकात केली होती. मात्र, त्यानंतर तो हसन अलीच्या बाॅलिंगवर किपरच्या हातात कॅच देऊन माघारी परतला. त्यामुळे भारतीय संघ चांगलाच अडचणीत आला होता.

भारताचे आघाडीचे ३ फलंदाज ३१ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला. मात्र, रिषभला पुन्हा एकदा घाई नडली.

Advertisement

विराट व रिषभ यांनी चौथ्या विकेटसाठी ४० चेंडूंत ५३ धावा जोडल्या. त्यात रिषभच्या ३९ धावा होत्या. विराट ४९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ५७ धावांवर झेलबाद झाला. विराट व रिषभ यांच्याशिवाय कोणीही पाकिस्तानी बाॅलिंगचा सामना करु शकले नाही. भारताने २० षटकांत ७ बाद १५१ धावा केल्या.

खेळपट्टीचा अंदाज पाहता, १५१ धावांचा बचाव करणे टीम इंडियासाठी सोपं नव्हते. मात्र, भारतीय बाॅलरला एकही विकेट घेता आली नाही, ही खरी शोकांतिका ठरली. पाकिस्तानने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतावर १० विकेट राखून पहिला विजय मिळविला, तोही अगदी दणक्यात…

Advertisement

बाबर आजम व मोहम्मद रिझवान या पाकिस्तानी ओपनर जोडीने सगळ्या धावा केल्या. दोघांनीही वैयक्तिक अर्धशतके झळकात पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. टी-२० क्रिकेटमधील ही त्यांची चौथी शतकी भागीदारी ठरली.

बाबरने 52 चेंडूत 68 धावा केल्या, तर रिजवानने 55 चेंडूत 79 धावा केल्या. भारताच्या एकाही गोलंदाजाला खास तर नाही किमान सुमार गोलंदाजीही करता आली नाही. एकही विकेट न घेता आल्याने भारताचा 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभव झाला.

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement