SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पदवीधारकांसाठी कृषी विभागात नोकरीची संधी, दरमहा मिळणार एक लाखांवर पगार, असा करा अर्ज..!

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यातील कृषी विभागात (Department of Agriculture Pune) विविध पदांसाठी भरती (Job recruitment) होणार आहे. त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने उमेदवारांना अर्ज करावे लागणार आहे.

उमेदवारांनी अर्ज कसा करायचा आहे, त्यासाठी कधीपर्यंत मुदत आहे, कोणकोणत्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया हाेणार आहे, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

कोणत्या पदासाठी भरती..?
स्टेट लीड मॅनेजर (State Lead Manager)
एंटरप्राइज डेव्हलपमेंट मॅनेजर (Enterprise Development Manager)
मॅनेजर फूड टेक्नॉलॉजी (Manager Food Technology)

मॅनेजर सोशल सेक्टर स्पेशालिस्ट (Manager Social Sector Specialist)
मॅनेजर (एमआयएस) (Manager (MIS))
एक्झिक्युटिव्ह असिस्टंट (Executive Assistant)

Advertisement

शैक्षणिक पात्रता, अनुभव व दरमहा पगार
स्टेट लीड मॅनेजर – डिप्लोमा इन बिझिनेस मॅनेजमेंट किंवा पदव्युत्तर डिग्री, पगार- 1,75,000/- रुपये
एंटरप्राइज डेव्हलपमेंट मॅनेजर – इंजिनिअरिंगमध्ये पदवी. पगार – 1,10,000/- रुपये
मॅनेजर फूड टेक्नॉलॉजी – फूड इंजिनिअरिंग किंवा फूड टेक्नोलोंजि मध्ये M.Sc/ B.Tech. पगार- 1,10,000/- रुपये.

मॅनेजर सोशल सेक्टर स्पेशालिस्ट – MSW, पगार 1,10,000/- रुपये
मॅनेजर (एमआयएस) – Data Analytics, पदव्युत्तर शिक्षण. 1,10,000/- रुपये
एक्झिक्युटिव्ह असिस्टंट – कोणत्याही शाखेतून पदवी. 40,000/- रुपये

Advertisement

अर्ज पाठविण्याचा पत्ता
नोडल अधिकारी (PMFME),
कृषी आयुक्तालय, साखर संकुल,
शिवाजीनगर, पुणे – 411005

मेल आयडी- [email protected]

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2021

ऑनलाईन अर्ज करा-
http://krishi.maharashtra.gov.in/1001/Home

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement