SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून ‘कूझांगल’ चित्रपटाची निवड, असं काय आहे त्यात खास, वाचा..?

ऑस्कर पुरस्कार.. अर्थात अकॅडमी पुरस्कार (Academy Awards) चित्रपट क्षेत्रातील सर्वात मानाचा पुरस्कार.. अमेरिकेतील ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स ॲंड सायन्स’ या चलचित्र अकादमीमार्फत दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात.

लॉस एंजेलिस येथे 27 मार्च 2022 रोजी यंदाचा 94 वा अकॅडमी पुरस्कार सोहळा रंगणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास दैदिप्यमान असला, तरी अजूनपर्यंत कोणत्याही भारतीय चित्रपटाला ऑस्कर (Oscar) पुरस्कार मिळालेला नाही.

Advertisement

आमिर खानचा ‘लगान’ यापूर्वी 2001 मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या श्रेणीत टाॅप-5 मध्ये पोहोचला होता. त्याशिवाय ‘मदर इंडिया’ (1958), ‘सलाम बंबई’ (1989) चित्रपटांना याआधी ‘टॉप- 5’ मध्ये स्थान मिळाले होते. गेल्या वर्षी (2021) ‘जल्लीकट्टू’ हा मल्याळम चित्रपट नामांकित केला होता.

यंदा ऑस्कर पुरस्कार निवडीसाठी 14 चित्रपट शर्यतीत होते. त्यात मल्याळम चित्रपट ‘नयातू’, तमिळ ‘मंडेला’, चित्रपट निर्माते शूजित सरकारचा ‘सरदार उधम’, विद्या बालनचा ‘शेरनी’, फरहान अख्तरचा ‘तुफान’, कॅप्टन विक्रम बत्रांच्या जीवनावर आधारित ‘शेरशाह’ आणि मराठी ‘गोदावरी’ चित्रपटांचा समावेश होता.

Advertisement

Advertisement

चित्रपट निर्माते शाजी एन. करुण यांच्या नेतृत्वाखालील 15 सदस्यीय ज्युरीने एकमताने एका चित्रपटाची निवड केली, तो म्हणजे ‘कूझांगल’ (Koozhangal)… हा एक तमिळ चित्रपट असून, यंदा तो ऑस्करवारी करणार आहे. विनोताराज पी. एस. यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलंय.

चित्रपटाची कथा
या चित्रपटाची कथा एक मद्यपी माणसावर आधारित आहे. जो दारू प्यायल्यानंतर सतत आपल्या पत्नीला मारहाण करीत असतो. राेजच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी वैतागून घर सोडून निघून जाते. त्यानंतर हा माणूस आपल्या लहान मुलाला घेऊन आपल्या बायकोला शोधून परत आणण्यासाठी निघतो.

Advertisement

‘कूझांगल’ या चित्रपटात चेल्लापंदी आणि करूथादैयान हे नवीन कलाकार आहेत. विघ्नेश, शिवन आणि नयनतारा निर्मित हा चित्रपट आहे. यावर्षी ऑस्करसाठी ‘कुझांगल’ हा भारताचा अधिकृत चित्रपट असल्याची माहिती फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या सरचिटणीस सुपर्णा सेन यांनी दिली.

चित्रपट निर्माता शिवन यांनी आपल्या चित्रपटाच्या निवडीची बातमी ट्विटरवर शेअर केलीय. ट्विटमध्ये ते म्हणतात, की ”अॅंड ऑस्कर गोज टू… असे कदाचित ऐकण्याची संधी मिळेल.. तुमची स्वप्ने सत्यात उतरण्यापासून फक्त दोन पावले दूर आहे. या बातमीपेक्षा आनंददायक काहीही असू शकत नाही.”

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement