SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अमिताभ बच्चन यांच्यासमोरच नवरा-बायकोमध्ये पेटले भांडण, बिग बींनी लावला डोक्याला हात..

क्विझ रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’चा यंदाचा 13वा सीजनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. बाॅलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या सहज, सुंदर संवादामुळे हा शो सगळ्यांची मने जिंकत आहे. शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकासोबत अमिताभ खूप मस्ती करताना दिसतात.

सोनी टीव्हीने शोचा नवा प्रोमो नुकताच शेअर केला. ‘कौन बनेगा करोडपती-13’च्या (Kaun Banega crorepati) पुढील भागात मात्र अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) मोठ्या संकटात सापडल्याचे दिसते. आगामी भागातील एक स्पर्धकाचे अमिताभ यांच्यासमोर बायकोसोबत भांडण सुरु होते.

Advertisement

स्पर्धक म्हणतो, की फ्लॅश मॉबसह आपण पत्नीला लग्नासाठी प्रस्ताव पाठवला होता. त्याने प्रभावित झालेले ‘बिग बी’ स्पर्धकाच्या पत्नीला विचारतात, की ते अजूनही इतका रोमँन्टिक आहेत का? त्यावर पत्नी ‘नाही’ असे उत्तर देते. ‘आता ते अजिबात वेळ देत नाहीत…’

 

Advertisement
View this post on Instagram

 

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

Advertisement

त्यावर स्पर्धक म्हणताे, की ‘सर, तुम्हीही जया मॅडमला वेळ देऊ शकत नाही, असं म्हणा…’ त्यानंतर अमिताभ बच्चन यांनाही हसू आवरत नाही. ते म्हणतात, की आता ते अधिकृत विवाह सल्लागार बनले आहेत. त्यानंतरही हे जोडपे थांबण्याचे नावच घेत नाही. त्यांच्या एकमेकांबद्दलच्या तक्रारी सुरुच राहतात.

Advertisement

स्पर्धक आणि त्यांच्या पत्नीतील वाढतच चाललेला वाद पाहून, ‘बिग बी’ डोक्याला हात लावत म्हणतात, की ‘भाई.. कोणीतरी आम्हाला वाचवेल का…?’ त्यानंतर ते या पती-पत्नीमधील दुरावा मिटवण्याचा प्रयत्न करताना दिसतात..

दुसरा करोडपती मिळाला..
‘कौन बनेगा करोडपती-13’च्या यंदाच्या सीजनमध्ये नुकताच दुसरा करोडपती मिळाला. साहिल अहिरवार असे त्याचे नाव असून, तो मध्य प्रदेशचा आहे. या शोमध्ये त्याने एक कोटी रुपये जिंकले. साहिलच्या आधी आग्रा येथील हिमानी बुंदेला यांनी एक कोटी रुपये जिंकले होते.

Advertisement

‘फॅब्युलस फ्रायडे’च्या या आठवड्यातील भागात अभिनेत्री क्रिती सेनन व राजकुमार राव दिसणार आहेत. ‘हम दो-हमारे दो’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते या शोमध्ये येणार असल्याचे समजते.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement